Covaxin | गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली लस तयार, सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगी

भारताला कोरोनाविरोधाच्या लढाईत मोठं यश आलं आहे. भारतात कोरानाची पहिली लस तयार झाली आहे (First corona vaccine developed in India)

Covaxin | गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली लस तयार, सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगी

हैदराबाद : भारताला कोरोनाविरोधाच्या लढाईत मोठं यश आलं आहे. भारतात कोरानाची पहिली लस तयार झाली आहे (First corona vaccine developed in India). भारत बायोटेक कंपनीने ही लस तयार केली आहे. या लसीला केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे (First corona vaccine developed in India).

भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) असं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली आहे. या लसीची जुलै महिन्यात मानवी चाचणी केली जाईल. या लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरली तर त्याचा फायदा संपूर्ण जगाला होईल.

हेही वाचा : मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, कराचीतून फोन आल्याचा संशय, सुरक्षा वाढवली

व्हायरसच्या स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्ही येथे वेगळं करण्यात आलं होतं. त्यानंतर ते हैदराबादला भारत बायोटेक कंपनीकडे पाठवण्यात आलं. तिथे संशोधन केल्यानंतर भारतातील पहिली कोरोना लस विकसित झाली.

दरम्यान, “देशातील पहिली स्वदेशी लस आम्ही तयार केली, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. ही लस तयार करण्यासाठी आयसीएमआर आणि एनआयव्हीने केलेली मदत उल्लेखनीय आहे”, अशी प्रतिक्रिया भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष डॉ. कृष्णा ईल्ला यांनी दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी हजारो वैज्ञानिक आणि संशोधक काम करत आहे. जगातील बहुतेक देश लसीचं काम करत आहेत. जगभरात 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था या कामात अहोरात्र मेहमत घेत आहेत. भारतातही अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, भारत बायोटेकने पहिल्या लसीचं घोषणा केली आहे. या लसीकडे देशासह जगभरातील लोकांच्या आशा आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *