Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : दिलासादायक! राज्यात आज एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : दिलासादायक! राज्यात आज एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 12:08 AM

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर  सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची  संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात बुधवारी दिवसभरात 46 हजार 723 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 32 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 86 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 54 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. पुणे ग्रामीण 1 पिंपरी चिंचवडमध्ये 6 रुग्ण, मुंबईत 21, सातारा 3 आणि नाशिकमध्ये 2 रुग्ण सापडले आहेत. सापडलाय. आतापर्यंत राज्यात 1367 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.734 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे