तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता असं तुम्हाला वाटतं का? तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्टाने फटकारले..

तुकाराम मुंढे यांनी अन्न औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. मात्र, आता कोर्टाकडून त्यांना मोठा दणका देण्यात आला. थेट कोर्टाने तुरुंगात जावं लागेल, असेही म्हटले आहे.

तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता असं तुम्हाला वाटतं का? तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्टाने फटकारले..
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 29, 2026 | 7:20 PM

राज्यासह देशातही तुकाराम मुंढेंच्या खात्याच्या कारवायांचं कौतूक होत असताना, दुसरीकडे तुम्ही स्वतःला देव समजता का…अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं अन्न-औषध प्रशासन खात्यावर टीका केलीय….फक्त टीकाच नाही तर मुंबईतल्या वांद्रेतील एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कॅन्टिन तातडीनं सुरु करण्याचेही आदेश कोर्टानं दिले. हा एक प्रकारचा मोठा झटका म्हणावा लागेल. 20 ऑगस्टला मुंढेंच्या अन्न-औषध प्रशासन विभागानं एमसीएच्या कॅन्टिनची पाहणी केली. किचनला 110 पैकी 87 गुण देण्यात आले, त्यानंतर 25 ऑगस्टच्या फेरनिरीक्षणात गुणांकन वाढून 110 पैकी 95 झाले. पण तरीही कॅन्टिन बंदचे आदेश मिळाल्याचा दावा करत एमसीएनं कोर्टात धाव घेतली होती.

त्यावर तुम्ही स्वत:ला देव समजता का? असा सवाल उच्च न्यायालयाने एफडीएला विचारला. मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. एफडीएने कायदेशीर स्थितीचा पूर्णपणे अभ्यास
न करता “अनावश्यक घाई” का केली? आम्ही तुमचा विभाग आणि अधिकाऱ्यांना खडसावून थकलो आहोत, यापूर्वीच प्रकरण पुन्हा विचारात घेण्याचे कोर्टाचे निर्देश असतानाही एफडीएने “व्यावहारिक ऐवजी केवळ तांत्रिक दृष्टिकोन”
स्वीकारत परवाना रद्द केला.

म्हणून आता कठोर आदेश देण्याची वेळ ओढावलीय. निर्देश असतानाही कारवाई का., हे आम्हाला पटवून द्या. अन्यथा
न्यायालयाचा अवमान म्हणून तुरुंगात जावं लागेल…. तुमचे अधिकारी नाउमेद होवू नयेत म्हणून अजून कितीवेळा समतोल साधायचा? ‘तलवारीने डास मारले जात नाहीत?’ असं आपण का म्हणतो? तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता असं तुम्हाला वाटतं का? असे प्रश्न कोर्टानं तुकाराम मुंढेंच्या अन्न-औषध प्रशासनाला विचारले आहेत.

एकीकडे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे काैतुक होत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची कमालीची क्रेझ आहे. सर्वत्र त्यांचे फक्त आणि फक्त काैतुक होत आहे. मात्र, दुसरीकडे कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले आहे. निर्देश असतानाही कारवाई का., हे आम्हाला पटवून द्या. अन्यथा न्यायालयाचा अवमान म्हणून तुरुंगात जावं लागेल, असेही थेट म्हणण्यात आले आहे.

 

Follow Us