मोदी, फडणवीसांचं कौतुक महागात, आडम मास्तरांचं पक्षातून निलंबन

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणं सीपीआय (एम) नेते नरसय्या आडम यांना महागात पडलंय. त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. मोदी सोलापूर दौऱ्यावर असताना जाहीर सभेत त्यांनी सरकारचं कौतुक केलं होतं. या कृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचं कारण देत सीपीआय(एम)ने त्यांची तीन महिन्यांसाठी सेंट्रल कमिटीतून हकालपट्टी केली. सोलापुरातील शहर …

मोदी, फडणवीसांचं कौतुक महागात, आडम मास्तरांचं पक्षातून निलंबन

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणं सीपीआय (एम) नेते नरसय्या आडम यांना महागात पडलंय. त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. मोदी सोलापूर दौऱ्यावर असताना जाहीर सभेत त्यांनी सरकारचं कौतुक केलं होतं. या कृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचं कारण देत सीपीआय(एम)ने त्यांची तीन महिन्यांसाठी सेंट्रल कमिटीतून हकालपट्टी केली.

सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात कामगारांची संख्या मोठी आहे आणि या कामगारावर राजकीय नेत्यांचं भवित्यव अवलंबून आहे. त्यामुळे कामगारांची मते ही निर्णायक ठरतात. माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या रेनगर फेडरेशच्या 30 हजार घरांच्या भूमीपूजनाने मोदींच्या 2019 च्या प्रचाराला पूरक अशी संधी दिली. त्यातूनच भाजपने प्रणिती शिंदेंचा मतदारसंघ माकपच्या माध्यमातून पुन्हा खिळखिळा करण्याचा चंग बांधलाय.

यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात नरसय्या आडम यांनी दहा हजार घरांचा प्रकल्प पूर्ण केलाय. आता भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांनी 30 हजार घरांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. मात्र यातूनच त्यांना पुन्हा आमदार होण्याची संधी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच कम्युनिस्ट आणि भाजपात विस्तव आडवं जात नसलं तरीही तत्त्व बाजूला ठेवून डाव्या विचार सरणीच्या नरसय्या आडम यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं महाराष्ट्राने पाहिलं.

आघाडी सरकारच्या काळात दाबून ठेवलेली फाईल भाजप सरकारने मंजूर करुन निधी देखील दिला. त्यामुळेच मोदी सरकारचे कौतुक केलं, असंही आडम मास्तर यांनी स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातम्या :

सुरुवात मराठीत, भाषण हिंदीत, शेवट कन्नड, मोदींच्या भाषणाने नेते अवाक्

‘ही’ घोषणा करताच सोलापुरात ‘मोदी, मोदी’च्या घोषणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *