VIDEO : ना लग्न, ना साखरपुडा, ही गर्दी भाऊ वाढदिवसाच्या पार्टीची, भाजप कार्यकर्त्यांच्या वाढदिवसात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

| Updated on: Feb 18, 2021 | 6:19 PM

डोंबिवलीत लग्न किंवा साखरपुढा नाही तर चक्का भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवासानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं (Crowd in Birthday program of BJP leader Sandip Mali)

VIDEO : ना लग्न, ना साखरपुडा, ही गर्दी भाऊ वाढदिवसाच्या पार्टीची, भाजप कार्यकर्त्यांच्या वाढदिवसात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!
Follow us on

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात साधारणपणे लग्न हे एकदाच होतं. त्यामुळे अनेक लोक लग्न, साखरपुडा मोठ्या जल्लोषात साजरी करतात. मात्र, सध्या कोरोना संकट असल्याने सरकारने लग्न समारंभासाठी गर्दीबाबत काही नियमावली जारी केलीय. लग्न समारंभात कोरोना पसरण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे जरुरीचं आहे. पण डोंबिवलीत लग्न किंवा साखरपुढा नाही तर चक्का भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवासानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले. मात्र, या कार्यक्रमात कुणीही मास्क वापरलेलं दिसलं नाही. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला  (Crowd in Birthday program of BJP leader Sandip Mali).

विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सर्व नियम पाळण्याचे आव्हान केले जात आहे. तरीदेखील बुधवारी (18 फेब्रुवारी) डोंबिवलीत भाजपाचे माजी उपजिल्हाध्यक्ष संदीप माळी यांचा वाढदिवस शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला (Crowd in Birthday program of BJP leader Sandip Mali).

कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टेंसिंगच्या फज्जा तर उडालाच त्यासोबत लोकांच्या तोंडावर मास्क सुद्धा नव्हते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात लहान मुलांचा समावेश देखील मोठ्या संख्येने होता. आता महापालिका आणि पोलीस काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमरावती आणि यवतमाळमध्ये लॉकडाऊनची घोषणा, नागरिक अजूनही गंभीर नाहीत?

राज्यात कोरोना पुन्हा डोकंवर काढू लागला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरानाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचे दररोज नव्याने रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, नागरिकांमध्ये अजूनही गांभीर्य दिसत नाही. अनेकांनी मास्क वापरणं सोडून दिलं आहे. हे असंच सुरु असलं तर येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाची दुसरी लाट राज्यात फार भयानक असेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

संबंधित बातमी :

मोठी बातमी: कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुनश्च: लॉकडाऊन

महाराष्ट्रातल्या ह्या 11 शहरांवर लॉकडाऊनचं संकट? कोरोना वाढतोय, यंत्रणा अलर्टवर!