AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATS Action: एटीएसची राज्यभरात मोठी कारवाई, अहिल्यानगर, यवतमाळसह अनेक ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात, मोठी खळबळ

ATS Action in Maharashtra: राज्यात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगर, यवतमाळसह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काही तरूण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे समोर आल्याने ही ताबडतोड कारवाई करण्यात आली आहे.

ATS Action: एटीएसची राज्यभरात मोठी कारवाई, अहिल्यानगर, यवतमाळसह अनेक ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात, मोठी खळबळ
एटीएसची मोठी कारवाई
| Updated on: Feb 15, 2026 | 12:19 PM
Share

ATS Action in Maharashtra: एटीएसने राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसचे सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. जवळपास २१ ठिकाणी एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान या कारवाईने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मुकुंदनगरमध्ये छापेमारी

अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएसने छापेमारी केली. मध्यरात्री एटीएसने ही छापेमारी केली. गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखल्या जातो. गेल्या दोन ते तीन वर्षात औरंगजेबाचं उद्दातीकरणाचा प्रयत्न असो वा पाकिस्तानच्या घोषणा असो अहिल्यानगर हे चर्चेत आले आहे. यापूर्वी अहिल्यानगरमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या तरुणांची माथी भडकवण्याचे प्रयत्न पण समोर आले होते. त्यानंतर आता एटीएसच्या छापेमारीने पुन्हा एकदा हा भाग चर्चेत आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात एटीएसचे 20 पथक दाखल

दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची 20 पथक दाखल झाले आहेत. एटीएसकडून उमरखेड, पुसदमध्ये संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईत वरिष्ठ आयपीएस अधिकारी ही सहभागी झाले आहेत. राज्यात एटीएएसने रात्रभर गोपनीय कारवाई केली. उमरखेड आणि पुसदमध्ये एटीएसचे 20 पथक तळ ठोकून आहेत. रात्री त्यांनी अनेकांची चौकशी केली. तर काही तरुणांना, संशयितांना ताब्यात घेतले आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात रात्रभर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अत्यंत गोपनिय पद्धतीने करण्यात आली. रात्री अनेकांची चौकशी करण्यात आली.

संशयितांची कसून चौकशी

विदर्भातील चार ते पाच ठिकाणी आणि अहिल्यानगरमध्ये एटीएसने दहशतवादी कारवायासंदर्भात संपर्कात असलेल्या काही संशयितांच कसून चौकशी केली. रात्री संशयितांच्या घरावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी यावेळी स्थानिक नागरिकांकडून कसून चौकशी केल्याची माहिती पण समोर येत आहे. संभाव्य घातपाताचा संशय बळाव्याने एटीएसने तातडीने ही कारवाई केली. आज महाशिवरात्र आहे. अनेक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे. तर शिवजंयतीसह इतर प्रमुख कार्यक्रम, सण सुद्धा आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.  या कारवाईत काही जणांना ताब्यात घेण्यात आले असले तरी कुणाला अटक केली हे अद्याप समोर आलेले नाही.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...