रोहित पवारांच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळलं; अजितदादा अपघात प्रकरणात भरणेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
रोहित पवारांच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजितदादा अपघात प्रकरणात दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी अजितदादा अपघात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. रोहित पवारांच्या आरोपावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विमान मालकांना वाचवणारे मफलरमॅन देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवारांचे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. त्यानंतर आता अजितदादा अपघात प्रकरणात दत्तात्रय भरणे यांनी अपघाताचा अहवाल समोर आणावा, अशी मागणी करण्यात आली.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माधम्यांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांच्या आरोपावर दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच देशाच्या गृहमंत्र्यांकडे विनंती केली की, अजित पवारांच्या अपघात प्रकरणाला 10 महिने झाले आहेत. आता तत्काळ अपघात प्रकरणचा अहवाल समोर आणावा. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जवळचे मित्र होते. देवेंद्र फडणवीस यांचे दादांवर खूप प्रेम होतं. अजितदादा विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांचं अजित पवारांवर किती प्रेम होतं, ते मी पाहिलं होतं. कुणीच या प्रकरणी राजकारण करू नये, लवकरात लवकर तपास पूर्ण होऊन सत्य बाहेर यावं. कुणाचा कुणासोबत फोटो समोर आला म्हणजे तो दोषी आहे असं नाही’.
दुष्काळावर भाष्य करत करताना म्हटलं की, ‘दुष्काळच वर्ष आहे. दिपावलीला शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी ५ हजार मदत राज्य सरकारने केली आहे. १ कोटी १० लाख शेतकऱ्यांपैकी १ कोटी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये मदत केली आहे. केंद्र सरकारकडून आधी जी जिरायती बागायती शेतीनुकसानासाठी असलेली रक्कम आता वाढवली आहे. केंद्र सरकारकडे सुधारित दुरुस्ती करून मदतीचा प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येईल. मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी करून पाठवण्यात येईल. अडचणीच्या काळात जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आमच्या वतीने केला जाईल. आपण अग्रिम मदत आधीच केलेली आहे. केंद्र सरकारकडे आपण लवकरच केंद्रकडून मिळणाऱ्या मदतीचा दुरुस्तीचा प्रस्ताव देणार आहोत. राज्य सरकार २ हजार देणार आहोत, असं काही नाही’.