Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंनी पुढच्या काळात वेगळी काही भूमिका घेतली तर वेगळं ठरेल, दीपक केसरकरांचं मोठं विधान; बंडखोरांचा शिंदेंना इशारा?

| Updated on: Jul 02, 2022 | 4:07 PM

दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी यावेळी मवाळ भूमिका घेतली. शिवबंधन प्रेमाचे बंधन, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांची भविष्यातील भूमिका वेगळी झाली तर वेगळे ठरेल असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंनी पुढच्या काळात वेगळी काही भूमिका घेतली तर वेगळं ठरेल, दीपक केसरकरांचं मोठं विधान; बंडखोरांचा शिंदेंना इशारा?
पत्रकार परिषदेत बोलताना दीपक केसरकर
Image Credit source: tv9
Follow us on

पणजी/मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढील काळात वेगळी काही भूमिका घेतली तर वेगळे ठरेल, असे मोठे विधान शिंदे गटाचे नेते आणि शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोणतेही वक्तव्य आहे, तर आम्ही कोणीही त्याला उत्तर देणार नाही. राजकारणापेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. आत्ता जरी आमची ही भूमिका असली, तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी आदर आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. तर ते आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही स्टेटमेंटला आम्ही उत्तर देणार नाहीत. याचा अर्थ आमच्याकडे उत्तरे नाहीत, असे नाही. मात्र उद्या एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली तर ते वेगळे ठरेल, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी शिंदेंना दिल्याचे बोलले जात आहे.

‘शिंदे आता विधीमंडळाचे नेते’

शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरून हटविल्यानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शिंदेंना पदावरून दूर करणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. आधी आम्ही त्यांना उत्तर देऊ. त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली नाही, तर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू, असा इशारा केसरकर यांनी शिवसेनेला दिला आहे. ते म्हणाले, की शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. ते आता विधीमंडळाचे नेते झाले आहेत. हे वैधानिक पद आहे. ते कोणा एका पक्षाचे नेते नसतात. त्यामुळे त्याबाबतीत आदर राखलाच पाहिजे. तर दुसरीकडे नेतेपदावरून काढणे, यासारख्या गोष्टी लोकशाहीला शोभादायक नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंविषयी मवाळ भूमिका

दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी यावेळी मवाळ भूमिका घेतली. शिवबंधन प्रेमाचे बंधन, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांची भविष्यातील भूमिका वेगळी झाली तर वेगळे ठरेल असेही म्हटले. त्यामुळे त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र सध्यातरी सर्व बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर?