AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन मिटलं, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

ज्या कुटुबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत बोलताना दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन मिटलं, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2025 | 9:20 PM
Share

गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केला जातात. मात्र ही योजना सुरू करत असताना सरकारने काही अटी घातल्या होत्या , ज्यामध्ये ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, ज्या महिलांचं वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असेल त्याच महिला या योजनेसाठी पात्र असतील अशा काही अटी होत्या, मात्र अनेक ठिकाणी पात्र नसलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं.

दरम्यान त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा या योजनेचा आता आढावा घेण्यास सुरुवात केली आहे, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिलांची नावं या योजनेतून कमी केली जात आहेत. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार आता ही योजना बंद होणार असल्यचां बोललं जात आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, खरचं ही योजना बंद होणार का? अशी भीती देखील अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  नेमका हाच संभ्रम दूर करण्याचं काम आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात केलं आहे, लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, सुरूच राहणार असल्याचं त्यांनी आजच्या दसरा मेळाव्यात म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावलं. आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवणारे हे तर कटप्रमुख आहेत,  हे पक्षप्रमुख नाही तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नंबरवरून टीका केली,  ते वरून खाली आले. तुम्ही घरात बसून वर गेला. किती टीका करता. तुमच्या सारखा रंग बदलणारा मी कधीच पाहिला नाही, असं हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...