AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंकडून आनंदाची बातमी, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा

राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात. आता या योजनेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंकडून आनंदाची बातमी, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा
लाडकी बहीण योजना Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2025 | 4:36 PM
Share

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात.  ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. मात्र ही योजना सुरू करत असताना सरकारने या योजनेसंदर्भात काही अटी देखील घातल्या होत्या, परंतु या योजनेच्या निकषात बसत नसताना सुद्धा अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे अशा महिलांची नावं या योजनेतून वगळ्याचं काम सुरू आहे.

सरकारने घातलेल्या अटीनुसार ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, तसेच ज्या महिलेच्या नावावर कुठलंही चारचाकी वाहन नाही, ज्या महिलांचं वय हे 65 वर्षांपेक्षा कमी आहे. अशाच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र अनेक महिला या निकषात बसत नसताना देखील लाडकी बहीन योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकारने केवायसी बंधनकारक केलं आहे.  केवायसीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांची ओळख पटवली जाणार आहे, तसेच ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांचं नाव या योजनेतून वगळ्यात येणार आहे.

दरम्यान सरकार सातत्यानं या योजनेमधून लाभ घेणाऱ्या महिलांची नावं कमी करत असल्यामुळे ही योजना बंद पडणार आहे,  असा आरोप आता विरोधकांकडून होत आहे, विरोधकांच्या या आरोपांमुळे लाभार्थी महिलांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे, खरच ही योजना बंद होणार का? अशी शंका काहींच्या मनात आहे. ही शंका दूर करण्याचं काम आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘कोणी माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, लाडक्या बहिणी, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू हेच आमचे काम आहे’ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक