उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुष्काळ पाहणी दाैऱ्यावर, आदित्य ठाकरे ही..
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दुष्काळाची पाहणी करण्यात आली. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दुष्काळ पाहणी दाैऱ्यावर आहेत. नांदेड दाैऱ्यावर सुनेत्रा पवार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी दुष्काळ दाैऱ्यावर होते. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात थेट बांधावर पोहोचून नुकसानाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले. अकोला, वाशिम जिल्ह्यात पाहणी एकनाथ शिंदेंनी केली. त्यातच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नांदेड दाैऱ्यावर आहेत. लोहा तालुक्यातील दुष्काळ सदृश्य भागाची त्या पाहणी करणार आहेत. सकाळी 9 वाजता त्यांच्याकडून पिकांची पाहणी केली जाणार आहे. सकाळी 8 वाजता नांदेड विमानतळावर सुनेत्रा पवार पोहोचणार आहेत. जवळपास दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने पीक करपली आहेत. शेतकरी राजा चिंतेत आहे. मोठे संकट उभे आहे. राज्यात पावसाने पाठ फिरवली. दुष्काळाची स्थिती राज्यात आहे. राज्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही.
दुपारी 4 वाजता शिवसेना युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे देखील दुष्काळ सदृश्य भागाची पाहणी करणार आहेत. कंधार तालुक्यातील गऊळ येथे आदित्य ठाकरे पाहणी करणार असल्याची माहिती मिळतंय. सत्ताधारी आणि विरोधकांचा आज दुष्काळी पाहणी दौरा आहे. नांदेड जिल्ह्यात सुनेत्रा पवार पाहणी करणार आहेत तर तिथेच आदित्य यांच्याकडूनही पाहणी केली जाईल.
आदित्य ठाकरे आज धाराशिव-सोलापूर आणि नांदेड दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांचा आज सोलापूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा करत आहेत. सकाळी 10.30 वाजता बोरामणी दक्षिण सोलापूर येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
त्यानंतर सकाळी 11 वाजता तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे भेट देऊन पाहणी करतील. दुपारी 12 वाजता लोहारा तालुक्यातील आष्टा मोड येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात मराठवाड्यासह सोलापूरमधील दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यात स्थिती गंभीर आहे. ऐन सप्टेंबर महिन्यात धरणे कोरडी आहेत. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. काही भागात अजिबात पाऊस झाला नाही. धरणातील पाणीसाठी कमी होत आहे.