AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian case: दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस देण्यापूर्वी संजय राऊतांचे मोठे विधान, ठाकरे कुटुंबीय…

Disha Salian case: दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Disha Salian case: दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस देण्यापूर्वी संजय राऊतांचे मोठे विधान, ठाकरे कुटुंबीय...
Sanjay raut on disha SalianImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 10:44 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दिशा सालियान प्रकरण चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यापासून अनेक अपडेट समोर येत आहेत. दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर आज दिशाचे वडील सतीश सालियन हे आदित्य ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांना अब्रू आहे आणि आम्हाला अब्रू नाही का? अब्रू अब्रू म्हणतात त्यांना अब्रू आहे आणि आम्हाला नाही का? तुम्ही ज्या पद्धतीने कोणाच्या तरी हातचं बाहुलं बनून आमच्यावरती चिखल फेक करताय, ठाकरे कुटुंबावर आमच्या प्रतिष्ठेचा, आमच्या अब्रूचा काही सवाल आहे की नाही? मी कालही म्हणालो हा जो प्रकार आहे काही बेवड्यांचा आणि उरबडव्यांचा आहे. यामध्ये काही बेवडे आहेत आणि काही उरबडवे आहेत. ते एकत्र आले. आणि त्यांना कोणी तरी नियंत्रीत करत आहे की तुम्ही हे करा, हे बोला, आज इकडे जा, तिकडे जा, हे सर्व चालू आहे.

“ठाकरे कुटुंब पुढे सरकतंय”

पुढे संजय राऊत म्हणाले की, नाहीतर मी अजूनही या विषयावर स्पष्टपणे बोललेला नाही. मी बोलणार. जर संयमाचा बांध तुटला तर मी बोलणार. मी पाहातोय. पण लक्षात घ्या हे जे कोणी तिचे वडील आहेत सहा वर्षांपासून त्यांनी हा विषय त्यांचं पूर्ण समाधान झालंय. काही वस्तूस्थिती त्यांना कळाल्यानंतर की ही हत्या नाहीये हा अपघात आहे. हा अपघात 2020 सालचं हे प्रकरण आहे. पण जेव्हा महाराष्ट्रात ठाकरे कुटुंब पुढे सरकतंय काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी की अशी प्रकरणे उकरुन काढायची. त्यासाठी यंत्रणा उभी करायची हेच चालू आहे ना? दुसरं काय चालू आहे याच्यामध्ये मला सांगा.

“त्या मुलीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी”

दिशा सालियान विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्या मुलीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे हे मी वारंवार सांगत आहे आणि संदर्भात सविस्तर निवेदन आदित्य ठाकरे यांनी काढलं आहे. जी व्यक्ती मृत व्यक्तीला कधी भेटली नाही, कधी ओळखत नाही, संबंध आला नाही त्याच्यावर तुम्ही चिखल फेक करता? मला माहिती आहे याच्यामागे कोण आहे? आणि का करताय? कुठून अर्थ पुरवठा होत आहे याच्या मागे. हे जे कोणी बॅरिष्ठर याच्यामागे जास्त बोलत आहेत त्यांचीही कुंडली येईल बाहेर.

Follow Us
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...