AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियान प्रकरणात पुराव्याशिवाय बोलू नका, भाजपाच्या नेत्याने टोचले कान, थेट..

दिशा सालियान प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरेंचे नाव येत आहे. आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केली जात आहे. यावर पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. यारदरम्यानच रविंद्र चव्हाण यांनी मोठे विधान केले.

दिशा सालियान प्रकरणात पुराव्याशिवाय बोलू नका, भाजपाच्या नेत्याने टोचले कान, थेट..
Disha Salian
| Updated on: Sep 19, 2026 | 10:11 AM
Share

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. दिशाचे वडील सतीश सालियान आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. कोर्टाने सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास दिला. ज्यात जबाबात दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. दिशाच्या वडिलांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. राज्यातील अनेक नेते यावर बोलताना दिसत आहेत. नितेश राणे दिशा सालियान प्रकरणात सतत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. यासोबतच भाजपाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यावर भूमिका घेतली. दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आदित्य ठाकरेंच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचेही बोलले जात आहे.

त्यातच आता दिशा सालियान प्रकरणात रविंद्र चव्हाण यांनी मोठे विधान केले. रविंद्र चव्हाण यांनी भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचल्याचे बघायला मिळतंय. दिशा सालियान प्रकरणाच्या आडून ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबाला डाग लावण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

रविंद्र चव्हाण यांनी दिशा सालियान प्रकरणात बोलताना म्हटले की, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे की, पुराव्याअभावी कधी बोलू नये. सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचे आहे की, आपल्याला पूर्णपणे माहित नाही किंवा आपल्याकडे सक्षम पुरावे नाहीत तोपर्यंत बोलले गेले नाही पाहिजे. दिशा सालियान प्रकरणात भाजपाच्या नेत्यांकडून विधाने केली जात आहेत.

जाहिरपणे नावे घेतली जात आहेत, त्यावरच बोलताना दिसत आहेत. आदित्य ठाकरेंचे नाव दिशा सालियान प्रकरणात वारंवार पुढे येत आहे. त्यातच आता सीबीआयकडून तपास केला जात आहे. दिशा सालियान हिचे वडील मातोश्रीवर जाणार आहेत. दिशा सालियान प्रकरणात गंभीर आरोप होत आहेत. त्यावर पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. त्यावरून भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांना हे सांगण्यासाठी इतके वर्ष लागली म्हणत टीका केली.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी