धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिलं निवदेन
धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. ही भेट नेमकी कशामुळे याचे कारण सुरुवातीला समोर आले नव्हते. परंतु नंतर धनंजय मुंडे यांनी दुष्काळ निवारणासंदर्भात ही भेट घेतली होती, असे मुंडे यांच्याकडूनच सांगण्यात आले.

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सध्या राज्यात दुष्काळ पडला आहे. सर्वच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. दुष्काळ निवारणासाठी आता सरकार पूर्ण ताकदीने काम करतंय. असंं असताना आता मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या बैठकीत दुष्काळ, शेतकऱ्यांची परिस्थिती आणि शेतकऱ्यांना केली जाणारी मदत यावर चर्चा करण्यात आली. सोबतच धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीचे एक निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
धनंजय मुंडे यांनी दुष्काळ निवारणासंदर्भात घेतली भेट
धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. ही भेट नेमकी कशामुळे याचे कारण सुरुवातीला समोर आले नव्हते. परंतु नंतर धनंजय मुंडे यांनी दुष्काळ निवारणासंदर्भात ही भेट घेतली होती, असे मुंढे यांच्याकडूनच सांगण्यात आले.
📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना. श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज भेट घेतली; शेती पिकांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळायला काही कालावधी लागणार… pic.twitter.com/FayqYgAqL2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 1, 2026
धनंजय मुंडे यांनी नेमकी काय माहिती दिली?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक्स समाजमाध्यमारील खात्यावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये फडणवीस यांच्या भेटीचे कारण त्यांनी सांगितले आहे. “महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना. श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज भेट घेतली; शेती पिकांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळायला काही कालावधी लागणार असल्याने तातडीने तात्पुरता दिलासा म्हणून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे किमान दोन – दोन हफ्ते एकत्रित वितरीत करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी दुष्काळी उपाययोजना व मदतीच्या अनुषंगाने चर्चा झाली,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.