पैसे द्या, तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी कशी? मंत्री संजय शिरसाठांवर संस्थाचालकाचे खळबळजनक आरोप

Sanjay Shirsat Ashram School Allegations : धाराशिव येथील आश्रमशाळेचे संस्थापक अरुण नीटोरे यांनी मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध आरोप केले आहेत. ‘शाळेचे पैसे द्या, तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी कशी आली?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

पैसे द्या, तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी कशी? मंत्री संजय शिरसाठांवर संस्थाचालकाचे खळबळजनक आरोप
Sanjay Shirsat Ashram School Allegations
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 7:15 PM

श्रीराम क्षीरसागर, धाराशिव टीव्ही9 प्रतिनिधी : आश्रमशाळेच्या आर्थिक प्रश्नावरून संस्थापक अरुण नीटुरे यांनी मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नीटोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिरसाठ यांच्यावर विविध आरोप करत “शाळेचे पैसे द्या, तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी कशी आली?” असा सवाल केला आहे. तसेच, “तुमचे जवळचे लोक पैसे गोळा करतात,” असा आरोपही अरुण नीटोरे यांनी केला आहे. आश्रमशाळेच्या पैशांचा प्रश्न आणि आर्थिक व्यवहाराबाबत त्यांनी या फेसबुक लाईव्हमध्ये थेट भूमिका मांडली आहे त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी कशी आली याची चौकशी करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संस्थापकाकडून करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हणाले अरुण नीटुरे?

संजय शिरसाट कधी आश्रम शाळेचे पैसे कधी देणार? देऊन टाका पैसै. आश्रम शाळांचा तळतळाट घेऊ नका साहेब. जे लोक तिथं ठेवलेत ते ३५-३५ लाख रुपये मागतात. तरी म्हणलं एक जिल्हा परिषदेचा साधा सदस्य माणूस एवढा मोठा झालाच कसा. पाच पाच कोटीच्या गाड्या, ७५ कोटींचे बंगले, हजारो कोटी रुपये. हे सगळे पैसे येतात तरी कुठून आम्ही विचार करत होतो. आमचा गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नका आम्ही देशोधडीला लागलोत. गोर गरिबांची लेकरं आम्ही सांभाळली आहेत. आमचे पैसे देऊन टाका. तुम्ही आणखी पाच हजार कोटी कमवा, आम्हाला काही करायचं नाही, पण आमचे पैसे आम्हाला देऊन टाका. आमचे गोरगरिबाचे पैसे अडवू नका. लै पैसै तुम्ही अडवले भाऊ. तुम्ही स्वतःच मोठे व्हायले. लै पेसे तुम्ही गोळा केले आहेत. हे सगळं वैभव तुमच्याकडे आलं कुठून. तुम्ही काय शेतात काम केलंय का, की कामाला गेलते कुठं, एवढं नका लुटू, असं नीटुरेंनी म्हटलं आहे.

Loading...

मुख्यमंत्र्यांकडे मालमत्ता चौकशीची मागणी

तुमच्याकडे समाजकल्याण खातं आहे. जरा समाजाची कामं करा. संविधान वाचवा, संविधानाप्रमाणे वागा, २७ वर्षे झाली तुम्ही शाळेची पैसै देत नाहीत. भंडारे नावाच्या एका व्यक्तीचंही नाव त्यांनी घेतलं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. हे सगळं फडणवीसांना कसं कळत नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाट यांच्याकडील मालमत्तेची चौकशी करावी असं, नीटुरे म्हणाले आहेत. दरम्यान, यासगळ्यावर अद्यापर्यंत संजय शिरसाटांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us