Omraje Nimbalkar : ‘खराब रस्त्यामुळे माझ्या मामाची गाडी..’ चिमुकल्याने थेट ओमराजेंना लावला फोन

Omraje Nimbalakar Audio Clip Viral: खासदार ओमराजे निंबाळकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

Omraje Nimbalkar : खराब रस्त्यामुळे माझ्या मामाची गाडी.. चिमुकल्याने थेट ओमराजेंना लावला फोन
| Updated on: Nov 11, 2026 | 10:59 AM

Omraje Nimbalkar Audio Clip Viral: ओमराजे निंबाळकर हे सामान्य नागरिकांचे फोन उचलण्यासाठी आणि उपलब्ध राहण्यासाठी ओळखले जातात, मात्र राजकीय घडामोडींमुळे त्यांच्या फोन संभाषणांच्या क्लिप्स वारंवार व्हायरल होत असतात. नुकतीच त्यांची एक क्लिप व्हायरल होत आहे. ज्यात एका चिमुकल्याने त्यांना थेट सवाल विचारला आहे.

हेलॉ सौंदना,आंबामधून बोलतोय, चेअरमन बोलतोय, यावर ओमराजे विचारताच नाव काय तुझं, यावर तो म्हणतो की, सुमंत पाळकर बोलतोय, हॅप्पी दिवाली, यावर खासदार म्हणाले की, हो तुलाही हॅप्पी दिवाली, का रं कशाला फोन केला असं त्यांनी चिमुकल्याला प्रश्न विचारला, या वर तो म्हणाला, आमच्या गावचे रस्ते कधी नीट करणार? यावर ओमराजे म्हणाले, रस्तो हॉय, अरे मी जरा आता दुष्काळाच्या मुद्याकडे वळलो आहे, ” यावर चिमुकला म्हणाला की,” तुमच्याकडे पैसे असतील की?” यावर ओमराजे म्हणाले माझ्याकडे नाहीये पैसा, तो शासनाचा पैसा आहे, ” यावर चिमुकला म्हणाला की, मग करा की नीट लवकर. माझ्या मामची गाडी घासली गेली, ” यावर ओमराजे म्हणाले, “तुझ्या मामाची गाडी घासली होय, बरं बरं, लय काळजी आहे तुला तुझ्या मामाची,  मामाला काय पोरगी बिरगी आहे का? असा सवाल विचारताच चिमुकला हसला आणि म्हणाला नाही. ” यानंतर ओमराजे म्हणाले,” तू फार लांबची तयारी करुन ठेवालास अरे, करु करु आपण नीट करु.”

 

खासदार ओमराजे निंबाळकर यांची क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपची पुष्टी अजून तरी ओमराजे निंबाळकर यांनी केलेली नाही. ओमराजे निंबाळकर सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत आहे. राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्तीने कर्जवसुली करून त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा निंबाळकर यांनी दिला आहे.

(TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us