dhiraj pardeshi case : यामागचे जे मास्टरमाइंड आहेत ते..कपाळावरच्या भगव्या टिळ्यामुळे मृत्यू प्रकरण, आमदार संग्राम जगताप यांची मागणी काय?

dhiraj pardeshi case : 7 ऑगस्ट रोजी स्ट्रीट लाईटच्या कामासाठी म्हणून धीरज दर्गादायरा कब्रस्तान परिसरात गेला होता. 9 ऑगस्ट रोजी धीरजचा मृत्यू झाला. अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं होतं.

dhiraj pardeshi case : यामागचे जे मास्टरमाइंड आहेत ते..कपाळावरच्या भगव्या टिळ्यामुळे मृत्यू प्रकरण, आमदार संग्राम जगताप यांची मागणी काय?
sangram jagtap-dhiraj pardeshi
| Updated on: Aug 14, 2026 | 1:41 PM

मनपाचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूमुळे अहिल्यानगरमधील वातावरण तापलं आहे. धीरजवर मागच्या आठवड्यात हल्ला झाला होता. धीरज हा अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील ठेकेदाराकडे हेल्पर म्हणून नोकरीला होता. कामासाठी म्हणून तो दर्गादायरा कब्रस्तान परिसरात गेला होता. त्यावेळी धीरजवर हल्ला झाला. सहा ते आठ जणांनी मिळून धीरजवर जीवघेणा हल्ला केला. यात जखमी झालेल्या धीरज यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं. 7 ऑगस्ट रोजी स्ट्रीट लाईटच्या कामासाठी म्हणून धीरज तिथे गेला होता. 9 ऑगस्ट रोजी धीरजचा मृत्यू झाला. धीरज परदेशीवरील हल्ल्याच्या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. धीरज परदेशी याची हत्या टिळा लावल्यामुळे झाल्याचा आरोप भाजपं आमदार संग्राम जगताप यांनी केला. आज त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या.

“या घटनेसंदर्भात कागदपत्र तयार होण्याआधीपासून चांगला सरकारी वकिल पाहिजे. ही घटना वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करणार आहोत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत.आमच्या मागण्या मांडणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या” असं संग्राम जगताप म्हणाले. “त्याच्यानंतर कालपासून वेगवेगळ्या घटना घडत आहेत. आंदोलन अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा भूमिका बदलण्याचं काम केलं. म्हणून आज आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली” असं जगताप म्हणाले.

या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

“आमची जी मागणी होती त्यांची जी अनधिकृत घर आहेत त्यांना शासनाने नोटीस लावली. पण त्यांनी हायकोर्टात जाऊन स्टे मिळवला. यामागचे जे मास्टरमाइंड आहेत ते वेगळे आहेत. पोलीस कानाडोळा करतायत. दुर्लक्ष करतायाय. त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. धीरज परदेशी यांच्या पत्नीला शासनाच्या माध्यमातून नोकरी मिळाली पाहिजे. आमच्या हिंदुत्ववादी संघटनांकडून मदत दिली जाईल. पण सन्मानजनक नोकरी मिळाली पाहिजे” अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us