दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले, माझ्या मुलीला..

दिशा सालियान प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. त्यातच दिशाच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला. दिशाचे वडील आज मातोश्रीवर जाणार आहेत. दिशाच्या वडिलांनी नुकताच अत्यंत मोठे आरोप केले आहेत.

दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले, माझ्या मुलीला..
Disha Salian
| Updated on: Sep 19, 2026 | 12:56 PM

दिशा सालियान प्रकरणात सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. दिशा सालियान प्रकरणात दिशाचे वडील सतीश सालियान गंभीर आरोप करत आहेत. कोर्टाने दिशा सालियान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला. सीबीआयला दिलेल्या जबाबात दिशाच्या वडिलांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आदित्य ठाकरेंचे नाव घेतले. यावर पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी दिशाच्या वडिलांकडून केली जात आहे. लेकीच्या न्यायासाठी दिशाचे वडील लढताना दिसत आहेत. त्यातच दिशाचे वडील आज त्यांच्या वकिलांसोबत मातोश्रीवर जाणार आहेत. त्यातच दिशाच्या वडिलांनी मोठे विधान केले. दिशाचे वडील स्वत: मातोश्रीवर जाऊन अब्रुनुकसानीची नोटीस देणार आहेत.

दिशाचे वडील म्हणाले की, मी मातोश्रीवर जाऊन नोटीस देणार आहे. सीबीआय म्हणत आहे की, तुम्ही आठ दहा दिवस थांबा, सगळे बाहेर येईल. कारवाई होईल, असे आश्वासन देण्यात आले. अटक करून तुरूंगात टाकायचे. जी काही शिक्षा असेल फाशी असेल किंवा जन्मठेप असेल ती द्यायची. माझ्या मुलीला त्रास दिला, त्याच्या डब्बल त्रास त्यांना व्हावा.

माझ्या वकिलांना त्यांनी धमकी दिली. तुम्हाला प्रॅक्टिस करू देणार नाही. तुम्ही काहीही बोलले तरीही चालते का? माझ्या मुलीला त्रास झाला. सीबीआयकडून मला 100 टक्के न्याय मिळेल. आतापर्यंत हे खोटे खोटे करत होते. पोलिस आणि एसआयटी. पण आता तसे होणार नाही. मला आत सोडले नाही तरीही मी आत जाणार असल्याचे सतीश सालियान यांनी स्पष्ट केले.

मला मातोश्रीवर जाऊ दिले नाही तरीही पत्र आत दिले जाईल. दिशा सालियान प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरे यांचे नाव येत आहे. अगोदर आदित्य ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणासोबत काहीच संबंध नसल्याचे जाहीर केले. मात्र, सतत आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात येत आहे. त्यातच आज दिशाचे वडील मातोश्री बंगल्यावर जाणार आहेत. लवकरच या प्रकरणात मोठ्या अपडेट पुढे येऊ शकतात.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us