संतोष बांगर यांनी आपल्याच समर्थकाच्या कानशिलात लगावली, नेमका वाद का उफाळला?

| Updated on: Jan 08, 2023 | 8:53 PM

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांची आणि वारंगा गावच्या ग्रामस्थांमध्ये आज बाचाबाची झाली.

संतोष बांगर यांनी आपल्याच समर्थकाच्या कानशिलात लगावली, नेमका वाद का उफाळला?
Follow us on

हिंगोली : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांची आणि वारंगा गावच्या ग्रामस्थांमध्ये आज बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ देखील समोर आलाय. हिंगोली च्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा गावात ग्रामस्थ आणि आमदार संतोष बांगर यांचे समर्थक यांच्यात बाचाबाची झाली. संतोष बांगर यांना मसाई देवीचं दर्शन घेण्यास स्थानिकांनी विरोध केला. त्यानंतर बांगर यांच्या समर्थकांसोबत काही स्थानिकांची बाचाबाची सुरु झाली. राजकीय नेत्यांना देवीच्या दर्शनास मनाई असल्याचं मत ग्रामस्थांचं होतं. तर वादानंतर संतोष बांगर यांनी आपल्याच समर्थकाच्या कानशिलात लगावली.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा गावात मसाई देवीची दरवर्षी यात्रा असते. या यात्रेला शंभर वर्षांची परंपरा आहे. या यात्रेत मसाई देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या संतोष बांगर यांना स्थानिकांनी विरोध केल्याने वाद निर्माण झाला.

हे सुद्धा वाचा

वादादरम्यान काही स्थानिकांनी दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संतोष बांगर यांच्या समर्थकांनी यावेळी घोषणाबाजी देखील केल्या.

अखेर गावातील ग्रामस्थांनी सामोपचाराने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतोष बांगर यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर संतोष बांगर यांनी मसाई देवीचं दर्शन घेतलं.