पालघर भागाला भूकंपाचा हादरा, नागरिकांत मोठी घबराट

पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला आहे. शनिवारी रात्री 10. 33 वाजता हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाने लोकात घबराट पसरल्याचे वृत्त आहे.

पालघर भागाला भूकंपाचा हादरा, नागरिकांत मोठी घबराट
earthquake in palghar
| Updated on: Sep 26, 2026 | 11:50 PM

पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला आहे. शनिवारी रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाने लोकात घबराट पसरून लोक घराबाहेर पडले.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी नोंदली गेली आहे.

पालघर जिल्ह्यासह डहाणू, तलासरी तालुक्याबरोबर पालघरमधील काही भागाला शनिवारी रात्री भूकंपा धक्का जाणवला आहे. रात्री साडे दहाच्या सुमारास हा धक्का जाणवल्याने लोकात घबराट उडाली. या धक्क्यामुळे लोक घराबाहेर आले.पालघर जिल्ह्यात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. पालघर जिल्ह्यात या आधीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा धक्का तुलनेने सौम्य असल्याचे म्हटले जात असून या धक्क्याने कोणतेही नुकसान झाल्याची माहिती उघडकीस आलेली नाही.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us