अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसची थेट पुण्यात छापेमारी, 66 मोबाईल, 13 लॅपटॉप जप्त, कारवाईचं कारण चकित करणारं; प्रकरण काय?

ईडी आणि अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसने पुणे, हैदराबा येथे संयुक्त कारवाई करत बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश केला. या छापेमारीत अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. या सेंटर्समधून सुमारे 220 कर्मचारी कार्यरत होते. छापेमारीदरम्यान डिजिटल उपकरणं जप्त करून मास्टरमाईंडचा शोध सुरू आहे.

अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसची थेट पुण्यात छापेमारी, 66 मोबाईल, 13 लॅपटॉप जप्त, कारवाईचं कारण चकित करणारं; प्रकरण काय?
| Updated on: Sep 17, 2026 | 6:29 PM

अमेरिकन नागरिकांना निशाणा बनवून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात आणि बनावट कॉल सेंटरविरोधात ईडी आणि अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसे संयुक्तरित्या मोठी कारवाई केली. ईडीच्या हैदराबाद झोनल ऑफीसच्या एका पथकाने 15 सप्टेंबर 2026 रोजी पुणे, हैदराबाद येथील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात पीएमएलए (PMLA) च्या कलम 17 अन्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हैदराबादमधील 2 आणि पुण्यातील 1 अशी 3 बनावट कॉल सेंटर उघडकीस आली, तिथे झडती घेतली असता ती सेंटर्स कार्यरत होती. या कॉल सेंटरमध्ये 220 कर्मचारी होते, जे अमेरिकन नागरिकांना घाबरवून फसवणूक करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तपास आणि प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान ईडीला एका अशा गटाबद्दल माहिती मिळाली, जो गट इतरांच्या संगनमताने हैदराबाद आणि पुणे येथे बनावट कॉल सेंटर्स चालवत होता. या माहितीच्या आधारे, एजन्सीने चार ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सर्चदरम्यान हैदराबाद येथील 2 तर पुण्यात 1 कॉल सेंटर लाईव्ह सापडलं. तिथे मोठ्या प्रमाणात वर्कस्टेशन आणि क्युबिकल्स होती. कॉम्प्युटरस हेडसेट, मोबाईल आणि नेटवर्किंग शी निगडीत संपूर्ण इक्विपमेंट्सचा वापर केला जात होता. ईडी आणि अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसने मारलेल्या छाप्यात डिजिटल उपकरणे आणि इतर वस्तू जप्त केल्य. यामध्ये 66 मोबाईल, 13 लॅपटॉप, हार्ड डिस्कचा समावेश होता. सुमारे 220 लोकं तिथे काम करत होती. आता त्या सर्व व्यक्तींची ओळख, त्यांच्या भूमिका आणि कॉल सेंटरमधील त्यांचं रिपोर्टिंग स्ट्रक्चर यांबाबत ईडीकडून तपास करण्यात येत आहे.

फोनकॉलद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप

ईडीच्या (ED) माहितीनुसार, या कॉल सेंटर्समधून अमेरिकन नागरिकांना फोन केले जात होते. पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी फोन करणाऱ्यांनी विविध खोट्या कारणांचा वापर केल्याचा आरोप आहे. हैदराबाद येथील दोन कॉल सेंटर्समधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक आणि खंडणी उकळण्याच्या प्रकारांशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावा सापडला आहे. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन आणि लॅपटॉप यांमधून या टोळीच्या कार्यपद्धतीबाबतची माहिती (मोडस ऑपरेंडी) मिळवण्यात आली आहे; पीडितांकडून उकळलेल्या पैशांशी संबंधित माहितीचाही त्यामध्ये समावेश आहे,

पुण्यातही तशीच व्हायची फसवणूक

पुण्यातील एका कॉल सेंटरमध्येही अमेरिकन नागरिकांना टार्गेट करण्यात येत होते, अशा कारवाया सुरू होत्या, अशा प्रकारचे पुरावे EDला सापडले आहेत. पटियाला आणि पुणे येथे चालणाऱ्या या कॉल सेंटर्समधील परस्पर संबंध काय आहे, ते शोधण्याचं काम आता ईडीकडून करण्यात येत आहे. ही दोन्ही ठिकाणं कोण मॅनेज करत होतं, कॉलिंग यंत्रणा नेमकी कुठून चालवली जायती आणि फसवणुकीतून मिळवलेली रक्कम कोणत्या मार्गांनी वळवली जात होती, याचाही तपास केला जात आहे.

मास्टरमाइंडचा शोध सुरू

ईडीने चंदीगडमधील एका निवासी संकुलाचीही झडती घेतली. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पटियाला येथील कॉल सेंटर्सचे कामकाज आणि नियंत्रण पाहणाऱ्या मास्टरमाइंडकडून या ठिकाणाचा वापर केला जात होता. या परिसरातून कॉल सेंटरच्या कामकाजाशी संबंधित माहिती असलेली अनेक डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली. अमेरिकन डॉलर्समध्ये मिळीलेली रक्कम भारतीय रुपयांमध्ये कन्व्हर्ट करण्याच्या आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या कामात गुंतलेल्या एका व्यक्तीबाबतही तपास यंत्रणेला त्या ठिकाणाहून माहिती मिळाली. ईडीकडून आता त्या व्यक्तीची भूमिका आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us