Eknath Shinde Thane Fire : ठाण्यात इमारतीत आग भडकली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन इमारतीत शिरले, अन्…

ठाण्यात दिवाळीत एका इमारतीत आग भडकली. त्यानंतर एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन इमारतीत पोहोचले. त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली.

Eknath Shinde Thane Fire : ठाण्यात इमारतीत आग भडकली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन इमारतीत शिरले, अन्...
eknath shinde news update
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 9:57 AM

 

राज्यात रविवारी एकीकडे लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला जात होता. तर दुसरीकडे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनांमुळे दिवाळीला गालबोट लागलं. राज्यासहित ठाणे शहरातील विविध भागात आगीच्या घटना घडल्या. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बहुमजली इमारतीला रविवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या 9 व्या मजल्यावर लागलेली आग ही 17 व्य मजल्यांपर्यंत पसरत गेली.  आगीच्या या घटनेने इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांची जीव धोक्यात आल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाने तत्परता दाखवल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या इमारतीला आग लागल्यानंतर रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी पोहोचलेल होते.

Loading...

वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डनर संकुलातील ‘कार्लाइन’ या 17 मजली इमारतीला रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे  देखील रहेजा गार्डन कॉम्प्लेक्समध्ये दाखल झाले. एकनाथ शिंदे इमारतीजवळ पोहोचले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षेच्या कारणात्सव संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर अंधारातच एकनाथ शिंदे हे एक मोठी बॅटरी हातात घेऊन इमारतीत शिरले. शिंदे हे इमारतीच्या पार्किंगमध्ये शिरले. त्यावेळी तिथे पार्किंगमध्ये अग्निशमन दलाचे जवान उभे होते. त्यांनी इमारतीला आग कशी लागली आणि बचावकार्याची माहिती घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी एक जण वरच्या मजल्यावर अडकल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी तो पोरगा यंग आहे ना? असं त्यांना विचारलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाला  व्हीलचेअरवरून खाली आणले जात असल्याचे सांगतिलं. इमारतीत धूर आहे का, टीम पोहोचली का, असेही प्रश्न विचारले.

रहेजा गार्डन संकुलातील कार्यालयात इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे, मुंबई परिसरातील अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या पोहोचल्या. सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवल्यास यश आलं. आग लागल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान 50 हून अधिक रहिवाशी, पाळीव प्राण्यांची सुखरुप सुटका केली. या आगीच्या घटनेत काहींना दुखापत झाली. तर आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मालमत्तेचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. नवव्या मजल्याला लागलेली आग ही काही क्षणात 17 व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. तर या घटनेनंतर ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. तर फटाके खुले मैदानात फोडण्याचे आदेश दिलेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us