AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saba Ali Khan: मला बेबो आवडते, पण अमृता सिंह… सैफची बहिण हे काय बोलली?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंहशी झाले होते. पण त्यांनी लग्नाच्या काही वर्षांनी घटस्फोट घेतला. आता सैफने दुसरे लग्न केले आहे. त्याने अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले. आता सैफची बहिण दोघींविषयी नेमकं काय बोलली? वाचा...

Saba Ali Khan: मला बेबो आवडते, पण अमृता सिंह... सैफची बहिण हे काय बोलली?
Saba ali khanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 9:44 AM
Share

बॉलिवूड नवा म्हणून अभिनेता सैफ अली खान ओळखला जातो. तो त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. सैफने दोन लग्न केली आहेत. पहिले लग्न त्याने अभिनेत्री अमृता सिंहशी केले होते. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्याने अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले. आता सैफची बहिण सबा अली खानने दोन्ही वहिनींवर वक्तव्य केले आहे. सबा नेमकं काय म्हणाली वाचा…

सबा अली खानने अलीकडेच अभिनेत्री अमृता सिंहशी असलेल्या संबंधांबाबत खुलासा केला आहे. सबा म्हणाली की, लहान वयात अमृताने तिला खूप प्रेम आणि मार्गदर्शन दिले होते. ती तिच्यासाठी फक्त वहिनी नव्हती, तर एक मोठी बहीण आणि आईसारखी होती. तिच्याशी सबा कोणताही विचार न करता मनातल्या गोष्टी शेअर करू शकत होती. सबाने हेही सांगितले की, सैफ आणि अमृता यांच्या घटस्फोटानंतर जरी त्यांच्या संबंधांत पूर्वीसारखी जवळीक राहिली नसली, तरी तिच्या मनात आजही अमृताबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. या संभाषणात सबाने करीना कपूर खानबद्दलही आपले प्रेम व्यक्त केले आणि म्हटले, “मला बेबो खूप आवडते, पण अमृताही माझ्याशी खूप चांगली होती.”

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत सबा अली खानने आपल्या कुटुंबाबद्दल आणि अमृता सिंहसोबत घालवलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तिने म्हटले की, जेव्हा सैफ अली खानने १९९१ मध्ये अमृता सिंहशी लग्न केले, तेव्हा ती केवळ १५ वर्षांची होती. अशा वेळी अमृता तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली होती. सबाच्या मते, अमृता तिला अनेकदा अशा गोष्टी समजावून सांगत असत, ज्या कदाचित तिच्या स्वतःच्या आईने त्या वेळी कडकपणे सांगितल्या होत्या. त्यामुळेच तिला अमृतासोबत खूप छान वाटत होते आणि तिचा सल्ला गंभीरपणे घेत असत.

सैफ अली खानची दोन लग्ने आणि चार मुले

सैफ अली खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १९९१ मध्ये अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले. त्यावेळी सैफ २१ वर्षांचा होता, तर अमृता ३३ वर्षांची होती. त्यांचे लग्न सुमारे १३ वर्षे टिकले आणि २००४ मध्ये ते वेगळे झाले. या लग्नापासून त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. त्यानंतर सैफ अली खानने ऑक्टोबर २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूर खानशी लग्न केले. या लग्नापासून त्यांना तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान ही दोन मुलगे आहेत. यामुळे सैफ चार मुलांचा बाप झाला आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?