AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्याची दिवाळी वेगळी होती का? बच्चन कुटुंबीयांच्या सेलिब्रेशनचे फोटो, चाहत्यांना खटकली एकच गोष्ट

नव्या नवेलीने शेअर केलेल्या कौटुंबिक फोटोंमध्ये ऐश्वर्या राय दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऐश्वर्याची दिवाळी काय वेगळी होती का, असा खोचक सवालही नेटकऱ्यांनी केला आहे.

ऐश्वर्याची दिवाळी वेगळी होती का? बच्चन कुटुंबीयांच्या सेलिब्रेशनचे फोटो, चाहत्यांना खटकली एकच गोष्ट
नव्या नवेली नंदा, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 09, 2026 | 9:21 AM
Share

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. बच्चन कुटुंबातील सदस्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. आता दिवाळी सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा चर्चेत आली आहे. नव्याने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी कशी साजरी केली, याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. मात्र, या फोटोंमध्ये आराध्या बच्चन दिसत असली तरी ऐश्वर्या राय बच्चन कुठेच दिसत नसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. नव्या नवेली नंदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिची आई श्वेता बच्चन नंदा, मामा अभिषेक बच्चन, भाऊ अगस्त्य नंदा आणि चुलत बहीण आराध्या बच्चन पाहायला मिळत आहेत.

नव्याने यावेळी लाल रंगाचा आकर्षक पारंपरिक पोशाख परिधान केला होता. तर अगस्त्य आणि आराध्या क्रीम रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. दिवाळीच्या रोषणाईने सजलेली बाल्कनी, कुटुंबासोबतचे खास क्षण आणि फटाक्यांच्या आतषबाजीची झलक या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय. एका फोटोत अगस्त्य आणि आराध्या एकमेकांना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत अभिषेक आणि श्वेता एकत्र फुलबाज्या पेटवून दिवाळीचा आनंद घेताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पहा फोटो-

आराध्या दिसली, पण ऐश्वर्या राय कुठे?

नव्याच्या या पोस्टमधील सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे ऐश्वर्या राय बच्चनची अनुपस्थिती. बच्चन कुटुंबाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला, मात्र ऐश्वर्या कुठे आहे, असा प्रश्न अनेकांनी कमेंटमधून विचारला आहे. काही चाहत्यांनी ‘ऐश्वर्या राय फोटोंमध्ये का नाही?’, ‘तिची दिवाळी वेगळी साजरी झाली का?’ असे प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, बच्चन कुटुंबातील सदस्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ऐश्वर्या दिसत नसल्याने यापूर्वीही अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. ऐश्वर्या आणि श्वेता बच्चन यांच्यातील कथित मतभेदांच्या चर्चाही पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, 5 नोव्हेंबर रोजी मुंबईत फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्र दिसले होते. दोघांनी एकमेकांचा हात हातात धरून पापाराझींसमोर आनंदाने पोज दिल्या होत्या. ऐश्वर्या लाल साडीमध्ये तर अभिषेक काळ्या रंगाच्या एथनिक पोशाखात दिसला होता. त्यांच्या या व्हिडीओ आणि फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.

Follow Us
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story