AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Updates : लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा पश्चिम रेल्वेला मोठा फटका, लोकल वाहतूक कोलमडली

Mumbai Local Updates: दिवाळीच्या फटाक्यांचा लोकल प्रवासाला मोठा फटका बसला आहे. लक्ष्मीपूजनानंतरच्या सकाळीच प्रवाशांचे हाल झाले असून सिग्नल बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत

Mumbai Local Updates : लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांचा पश्चिम रेल्वेला मोठा फटका, लोकल वाहतूक कोलमडली
Western Railway
| Updated on: Nov 09, 2026 | 9:07 AM
Share

Mumbai Local Updates: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा आणि विरार स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी लक्ष्मीपूजन होतं आणि सर्वत्र वाजविलेल्या फटाक्यांचा मोठा फटका रेल्वे यंत्रणा आणि सकाळी कमासाठी बाहेर निघालेल्या चाकरमान्यांना बसला आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनच्या दिवशी सर्वत्र वाजविलेल्या फटाक्यांमुळे रेल्वेच्या सिग्नल वायरिंग जळाल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल पंधरा ते अर्धा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला असून, अनेक कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होत आहे

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं असून, लवकरच लोकल सेवा सुरळीत होतील असं रेल्वे प्रशासनाकडून सागण्यात आलं आहे. सोमवारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे सेवे विस्कळीत झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

विरारमध्ये तीन ठाकाणी लागली आग

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांनी फटाके फोडले, पण याचा वाईट परिणाम देखील दिसून आला. विरारमध्ये तीन ठाकणी  भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. विरार पूर्व मोहक सिटी, विरार पश्चिम ग्लोबल सिटी कॉस्मो, एचडीआयएल सोसायटी या परिसरात फटाके आणि घरातील दिव्यांमुळे भीषण आग लागली.

रविवारी विरारच्या एचडीआयएल सोसायटीमध्ये एका बंद घरात भीषण आग लागली, आगीचा भडका एवढा मोठा होता की आजूबाजूच्या आणि वरच्या घरांना ही फटका बसला आहे. सुदैवाने कोणत्याही आगीच्या घटनेत जीवित हानी झाली नाही मात्र नुकसान मोठ्याप्रमाणात झालं आहे. त्यानंतर वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळावर पोहचून आग विझविल्या.

Follow Us
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story