मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला, आणखी एक आमदार गळाला; सहयोगी सदस्य…

Shivsena : पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढली आहे. एका शिक्षक आमदाराने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला, आणखी एक आमदार गळाला; सहयोगी सदस्य...
Eknath Shinde kiran Sarnaik MLA
Image Credit source: Google
| Updated on: Jul 01, 2026 | 10:26 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काल ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्याआधी अपक्ष आमदार यांनीही सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत.

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचा शिवसेनेला पाठिंबा

किरण सरनाईक यांच्या पाठिंब्यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सरनाईक यांनी अधिकृतपणे शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यामध्ये शिवसेना काम करत आहे. शिवसेनेचे काम पाहून सहयोगी सदस्य काम करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. अमरावती शिक्षक मतदार संघातून सरनाईक निवडून आलेले आहेत. शिवसेना दिलेला शब्द पाळते.

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काम केले – शिंदे

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ‘शिवसेना दिलेला शब्द पाळते. महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करत आहे, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला. शिक्षकांच्या प्रश्नावर न्याय मिळवण्यासाठी ते काम करत आहेत. ते माझ्यासोबत काम करत आहेत. आता त्यांनी शिवसेनेचं सहयोगी सदस्य पद त्यांनी घेतलं आहेत. शिक्षकांच्या अनेक मागण्या होत्या, त्यांच्याकडे लक्ष दिले जाईल.’

एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन पाठिंबा – किरण सरनाईक

एकनाथ शिंदे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘महायुती सरकारचं काम पाहून लोक येत आहेत, सहा खासदार आपल्याक़डे दाखल झाले आहेत. सचिन अहिर शिवसेनेत सामील झाले आहेत. आता सरनाईक हे सहयोगी सदस्य झालेले आहेत.’ शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा करताना आमदार किरण सरनाईक यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन शिवसेनेला पाठिंबा देत आहे.

 

Follow Us