AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Shivsena : दोन संकटमोचक उतरुनही यश नाहीच, नाशिकमधून शिंदेंच्या शिवसेनेसाठी बॅड न्यूज

Eknath Shinde Shivsena : विधान परिषद निवडणूक लढवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नाशिकमधून चांगली बातमी नाहीय. सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीला नाराजांची समजूत काढावी लागत आहे.

Eknath Shinde Shivsena : दोन संकटमोचक उतरुनही यश नाहीच, नाशिकमधून शिंदेंच्या शिवसेनेसाठी बॅड न्यूज
Eknath Shinde Image Credit source: PTI
| Updated on: Jun 06, 2026 | 10:38 AM
Share

नाशिकमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. नाशिक विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यात अद्याप महायुतीच्या नेत्यांना यश आलेलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषेदच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुती एकत्रितपणे ही निवडणूक लढवत असून नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली आहे. पण नाशिकच्या जागेसाठी भाजपचे स्थानिक नेते गणेश गीते आणि गोकुळे गीते आग्रही होते. महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतरही दोघा गीते बंधुंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात गणेश गीते यांची समजूत घालण्यात गिरीश महाजन यांना यश आलं. गणेश गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. पण गोकुळ गीते ही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. गोकुळ गीते माघार घेत नसल्याने दराडे यांच्या विजयाच्या मार्गात अडसर आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी काल मुंबईहून खास उदय सामंत नाशिकला आले होते. गिरीश महाजन सुद्धा नाशिकमध्ये होते. दोन्ही नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. पण गोकुळ गीते माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं आहे.

महाजन यांचा शब्द मानतात

गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. काल दिवसभर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गीते यांच्या मन धरणीचा प्रयत्न सुरु होते. मात्र गोकुळ गीते यांनी दोन्ही नेत्यांची भेट टाळली. लवकरच तोडगा काढू असा उदय सामंत यांना विश्वास आहे. गिरीश महाजन आज रात्री पुन्हा नाशिक मुक्कामी येणार आहेत. तर उदय सामंत उद्या रात्री नाशिक मध्ये येण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता निघून गेली आहे. त्यामुळे गोकुळ गीते यांनी आता नरेंद्र दराडे यांना समर्थन जाहीर करावं अशी शिवसेनेची मागणी आहे. गीते बंधु हे गिरीश महाजन यांचा शब्द मानतात असं बोललं जातं.

Follow Us
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं