AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा तर सूर्यावर थुंकण्याचा प्रकार… सपकाळ यांच्या PM मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

Eknath Shinde Reply Harshvardhan Sapkal : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हा तर सूर्यावर थुंकण्याचा प्रकार... सपकाळ यांच्या PM मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
Shinde Give Reply to Sapkal on Modi CriticismImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 26, 2026 | 4:21 PM
Share

नाशिकच्या चांदवड तालुक्यात आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. या मोर्चाला विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाषणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांना प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सपकाळ यांची मोदींवर टीका

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते की, मोदी यांनी आजू-बाजूच्या देशांसोबत **** घेतली आहे. जो पर्यंत **** खुर्चीवर आहे तो पर्यंत कांदा आयात होणार नाही. बांगलादेश श्रीलंका आपला कांदा घेणार नाही. नरेंद्र हा **** आहे. एपस्टीन फाईलमध्ये मोदींनी काय काय केलं ज्यामुळे ते ट्रम्प यांचे ऐकत आहेत? मोदींमुळे आपले चांगले होऊ शकत नाही. कांदा खरेदी आता APMC मधेच झाली पाहिजे. झोपेच सोंग करणारे खोट सरकार आहे. मोदींना बैलगाडीत बसून त्याची हिमालयात विल्हेवाट लावा.

एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

सपकाळ यांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, हर्षवर्धन सपकाळ हे जेमतेम एक दीड वर्ष झाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. ज्यांच्यावर आरोप केला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुरंधर आहेत. देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत. ज्यांनी आरोप केला ते असली **** आहेत. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली, म्हणून याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या देशीतील 140 कोटी जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

सपकाळ यांची फडणवीसांवरही टीका

हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे. मी तुमचा कांदा खाल्ला आहे, मी बेइमानी करणार नाही. नालायक म्हणायचे ह**** म्हणायचे, कांदाखोर म्हणायचे, असे हे नालायक सरकार आहे. फडणवीस तर गद्दार माणूस आहे. 24 रुपयांनी कांदा खरेदीचे आश्वासन दिलेले होते. फडणवीस म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही आणि लग्न केले. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खोटारडे मुख्यमंत्री आहेत.’

नेमकं काय म्हणाले शिंदे?

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट