AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: मागच्या दाराने मुख्यमंत्री झालात… 2019 च्या सत्तांतराचा मुद्दा उपस्थित करत एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले…

Eknath Shinde Dussehra Melava Speech: गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेसेनेच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची तोफ धडाडली आहे. त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Eknath Shinde: मागच्या दाराने मुख्यमंत्री झालात... 2019 च्या सत्तांतराचा मुद्दा उपस्थित करत एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले...
| Updated on: Oct 20, 2026 | 9:15 PM
Share

आज गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यात आला. या सोहळ्यसाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. त्यांनी भाषणातून विरोधकांवर मोठा निशाणा साधला आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज शिवसेनेला ६० वर्ष होत आहे. ही परंपरा आपण जपत आहोत. शेतकरी संकटात आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली आहे. ही वेळ शेतकऱ्यांसाठी धावून जायची आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही. शेतकरी आज अश्रू ढाळत आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास गेला. आम्ही सर्वांच्या बांधावर गेलो. आम्ही भाषण देणारे नाही. तर राशन देणारे आहोत. ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी त्यांचं दु:ख समजू शकतो.

ते म्हणाले की, आम्ही बांधावर गेलो तेव्हा शेतकरी रडत होते. मी मुख्यमंत्री असताना निकष बाजुला ठेऊन शेतकऱ्यांना मदत केली होती. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची लग्नाची जबाबदारी शिवसेनेची आहे. माझ्यावर आरोप करत आहेत. पण मी आरोपांनी उत्तर कामातून देईन. त्यांचा एकही दिवस मला शिव्या दिल्याशिवाय जात नाही. शेतकरी संकटात असताना मोर्चे काढत आहेत. अनेकांनी पश्न उपस्थित केला, ५ हजारांनी काय होणार. पण ५ हजार ही तातडीची मदत आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, कर्जमाफीसाठी ३२ हजार कोटींचं नियोजन केले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही शेतकऱ्यांसाठी मदत पाठवली आहे. तुम्ही कधी शेतकऱ्यांना बिस्किटचा पुडा तरी दिला का? शेतकऱ्यांची पिके करपून गेली आणि तुम्ही मोर्चे काढता. तुम्ही मागच्या दाराने निवडून मुख्यमंत्री झालात. सर्वात मोठी वोटचोरी २०१९ मध्ये झाली. जेव्हा तुम्ही भाजपच्या नावाने लढून आलात. नंतर महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केला. हा मतदारांसोबत विश्वासघात आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!