AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याची जाहीर प्रतिक्रिया; शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर राज्यात भाकर फिरणार?

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. त्यानंतर आता एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनणार असल्याचे म्हटले आहे.

पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याची जाहीर प्रतिक्रिया; शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर राज्यात भाकर फिरणार?
Eknath Shinde CM Again Says BhuseImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 3:32 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षाचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. त्यांनी अमित शाह यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली होती. त्यानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या एका मंत्र्याने एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार

शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे नंदुरबारमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जनतेला आजही विचारलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? जनता ही सांगेल की एकनाथ शिंदे. महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. काळजी करू नका परत या महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करताना आपण सर्वजण पाहणार आहोत.

एकनाथ शिंदे प्रत्येक माणसाला भेटतात

अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झोपडीतून आलेला माणूस मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जात नव्हता. एकनाथ शिंदे प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय झोपायलाही जात नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब प्रत्येक सभेत सांगतात महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिला नव्हता असं म्हणत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची भविष्यवाणी दादा भुसे यांनी केली आहे.

नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनाच भगवा झेंडा फडकणार

पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले की, ‘नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनाच भगवा झेंडा फडकणार. आपल्या विरोधात असलेले नेते आता आपल्या सोबत आहेत. नगरपालिकेचा विकास करायचा आहे. काळजी करायचं काही काम नाही कारण नगरविकास विभाग एकनाथ शिंदे कडे असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी लागणारा निधी निश्चितपणे उपलब्ध होईल.’

दरम्यान, दादा भुसे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले होते. आता भुसे यांच्या विधानानंतर राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे येणार का? याचे उत्तर आपल्याला भविष्यात मिळणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...