AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का, नेत्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेउलकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का, नेत्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2025 | 9:59 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मत मोजणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू असतानाच आता मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे माजी उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेउलकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

प्रीतम चेउलकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला. यामुळे शिवसेना शिंदे गटाला बळ मिळालं आहे, तर मनसेला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांचं काम पाहून आम्ही शिवसेना शिंदे गटात  पक्षप्रवेश केला, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रीतम चेऊलकर यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले प्रीतम चेऊलकर?  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांचं काम पाहून आम्ही पक्षात प्रवेश केला.  मनसेमध्ये अनेक गोष्टी होत्या,  आम्ही अनेक तक्रारी देखील केल्या, पण त्या वरपर्यंत काही पोहोचल्या नाहीत. म्हणून आम्ही मनसे सोडण्याचा विचार केला. दीड महीना आधीच पदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यावेळी पक्षाचा राजीनामा दिला नव्हता.  आम्ही फोन करून अनेक नेत्यांना सांगितलं,  मात्र आम्हाला कोणीही संपर्क केला नाही.  नेत्यांकडे तक्रारी करून त्यांनी दुर्लक्ष केलं, म्हणून आम्ही मनसेला रामराम केला, अशी प्रतिक्रिया यावेळी चेऊलकर यांनी दिली आहे.

दरम्यान सर्वच मनसैनिकांचं पक्षात स्वागत करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.  मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आणि तो मराठीच होणार, असं यावेळी बोलताना आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...