AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : शिंदेची पुन्हा दिल्लीवारी, खासदारांशी चर्चा आणि.. मोठ्या घडामोडींना वेग, काय घडणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा दिल्ली मुक्काम चर्चेत आहे. १० जूनला ते NDA च्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज ते शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीला हजर राहून सर्व खासदारांशी चर्चा करतील. हा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Eknath Shinde : शिंदेची पुन्हा दिल्लीवारी, खासदारांशी चर्चा आणि.. मोठ्या घडामोडींना वेग, काय घडणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत
| Updated on: Jun 08, 2026 | 10:57 AM
Share

राज्याच्या राजकारणातील घडामोडींना सध्या वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस राजधानी दिल्लीतच मुक्कामी असतील अशी शक्यता आहे. गेल्या महिन्यातही एकनाथ शिंदे हे दिल्लीस गेले होते, तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त बेट घेतली होती. त्यानतंर ते आज पुन्हा राजधानीत गेले असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आले असून ते बैठकीला हजर राहणार आहेत. एवढंच नव्हे तर 10 जून रोजी एनडीएची संयुक्त बैठक होणारआहे, त्यासाठी एकनाथ शिंदे उपस्थित असतील अशी माहिती मिळाली आहे.

ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय ?

दिल्लीत असताना एकनाथ शिंदे हे सर्व खासदारांशी चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदारही एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीमुळे पुन्हा ऑपरेशन टायगर सक्रीय झाल्याची चर्चा सुरू झाली असून आता काय घडणार, ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसणार का अशा विविध चर्चा सुरू झाल्या असून एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मे महिन्यातही शिंदे होते राजधानीत

अवघ्या काही दिवसांपूर्वी, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. एकनाथ शिंदे हे अचानकपणे आणि गुप्तता पाळत दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी अचनाक केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट बराच काळ चर्चा केली.  शिंदेंच्या या अत्यंत गोपनीय भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.  त्यांच्या या राजधान वारीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. एवढंच नव्हे तर  एकनाथ शिंदे यांच्यासोबत या दौऱ्यावर माजी मंत्रीही उपस्थित होते, त्यामुळे अनेकांन धक्का बसला होता.

तर आज, जून महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीत शिंदे यांचा 2 दिवस मुक्काम असून ते 10 तारखेला एनडीएच्या संयुक्त बैठकीलाही हजर असतील असे समजते. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात