AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच टेन्शन वाढलं, महायुतीमध्ये घडामोडींना वेग, बसणार मोठा धक्का?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी अजित पवार गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

शिंदेंच टेन्शन वाढलं, महायुतीमध्ये घडामोडींना वेग, बसणार मोठा धक्का?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2025 | 6:47 PM
Share

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून नुकताचं विभागनिहाय बैठका घेऊन संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे.  जिथे-जिथे युती शक्य असेल तिथे महायुतीमध्येच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे, मात्र जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रिपूर्ण लढती होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र दुसरीकडे आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भाजप नंतर आता राष्ट्रवादी  अजित पवार गटाकडून देखील ठाण्यात स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. पक्षाचे सरचिटणीस व ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी याबाबत तशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे.  ज्यांना ज्यांना वाटतंय महापौर आमचाच बसणार तर महापौर हा आमच्याच मर्जीतला बसणार, असं विश्वासही यावेळी नजीब मुल्ला यांनी व्यक्त केला आहे. भाजपने ठाण्यात अबकी बार ७० पारचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून  अबकी बार २५ पार नारा देण्यात आला आहे.

दरम्यान ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात आता महायुतीचे दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वबळाचा नारा दिल्यानं एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे ठाण्यात शिवेसना शिंदे गटाची देखील महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पदाधिकाऱ्यांवर एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झाले आहेत. युतीबाबत सर्व निर्णय आता फक्त शिंदेंच घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...