AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला, कुठे होणार युती अन् कुठे लढणार स्वबळावर?

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वी आता मोठी बातमी समोर आली आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे, फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

सर्वात मोठी बातमी! अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला, कुठे होणार युती अन् कुठे लढणार स्वबळावर?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2025 | 3:02 PM
Share

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता, या निवडणुका प्रचंड प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र अजूनही या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याबाबत कोणतंही चित्र स्पष्ट नाहीये.

त्यातच महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असा दावा करण्यात येत आहे, परंतु दुसरीकडे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून मात्र स्वबळाचा नारा दिला जात असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका या स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती होणार की तीनही पक्ष स्वबळावर लढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ठाणे  महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढता येईल का? याची चाचपणी होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे. विरोधकांना जिथं फायदा, तिथं महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार,  असंही फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान महाविकास आघाडीचा देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीये. तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राज ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत जाणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...