सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या आईची फसवणूक; अडीच कोटींची फेरफार

| Updated on: Dec 09, 2020 | 2:23 PM

बोबडे यांच्या आई मुक्ता यांच्या नावाने आकाशवाणी चौकात सिझन लॉन आहे. | CJI Sharad Bobde mother

सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या आईची फसवणूक; अडीच कोटींची फेरफार
Follow us on

नागपूर: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobde) यांच्या आईची अडीच कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. (Couple cheated CJI Sharad Bobde mother)

बोबडे यांच्या आई मुक्ता यांच्या नावाने आकाशवाणी चौकात सिझन लॉन आहे. या लॉनच्या देखरेखीची जबाबदारी ही तापस घोष याच्याकडे देण्यात आली होती. गेल्या 13 वर्षांपासून तो हा लॉन सांभाळत होता. या लॉनमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशेब तापस घोष आणि त्याच्या पत्नीकडून सांभाळला जात होता.

मात्र, आरोपीने मुक्ता बोबडे यांच्या वृद्धपणाचा आणि आजाराचा फायदा घेत हिशोबात हेराफेरी केली, खोट्या पावत्या तयार केल्या. अशाप्रकारे अडीच कोटी रुवयांचा ही फसवणूक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी सारा प्रकार बोबडे कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यानंतर बोबडे कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा तपास झाला. चौकशीदरम्यान घोष दाम्पत्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याची कबुली दिली. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी तापस घोष याला ताब्यात घेतले.

‘माजी सरन्यायाधीशांचीही झाली होती ऑनलाईन फसवणूक’

गेल्यावर्षी माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनाही हॅकर्सनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. लोढा यांना एका मित्राच्या नावाने मेल आला होता. आर.एम. लोढा यांनी हा मेल वाचून मित्राला फोन केला. मात्र, त्या मित्राचा फोन बंद होता.

या मेलमध्ये मित्राच्या भाच्याला रक्ताशी संबंधित आजार असल्याचे सांगत आर.एम. लोढा यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली होती. तातडीने पैसे हवे असल्यामुळे आर.एम. लोढा यांनी मित्राच्या खात्यात एक लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आर.एम. लोढा यांच्या मित्राचा ई-मेल हॅक झाल्याची समोर आले होते.

संबंधित बातम्या: 

(Couple cheated CJI Sharad Bobde mother)