AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर पहिला राजीनामा, ठाकरेंच्या शिवसेनेतील सर्वात मोठी अपडेट समोर

नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर पहिला राजीनामा, ठाकरेंच्या शिवसेनेतील सर्वात मोठी अपडेट समोर
| Updated on: Aug 22, 2025 | 9:43 PM
Share

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत, या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.  मात्र त्यापूर्वीच  मुंबईतील दि बेस्ट इम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्थात बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

मात्र युती म्हणून लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मोठ्या पराभावाचा सामना करावा लागला. ठाकरे बंधूंना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.  एकूण 21 जांगासाठी ही निवडणूक होती. त्यापैकी 14 जागा या शशांक राव यांच्या पॅनेललने जिंकल्या तर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या पॅनलने सात जागांवर विजय मिळवला. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही.

दरम्यान आता या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटात हालचालींना वेग आला आहे. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्यासह इतर 12 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

‘उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवू इच्छितो की, शिवसेना – उध्व बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित बेस्ट कामगार सेनेचा मागील ३० वर्ष प्रथम ‘सरचिटणीस’ व नंतर ‘अध्यक्ष’ म्हणून दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली.

नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढीच्या सन २०२५-२०३० पर्यंत पंचवार्षिक निवडणुकीत बेस्ट कामगार सेना प्रणित उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला, त्याची संपूर्ण जबाबदारी स्विकारून मी माझ्या कार्यकारिणीसह (कोअर कमिटी) बेस्ट कामगार सेना या संघटनेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. कृपया त्याचा स्विकार करावा. ‘ असं या पत्रात म्हटलं आहे.

मोठा पराभव 

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं प्रथमच युतीमध्ये ही निवडणूक लढवली होती, मात्र 21 पैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या तर प्रसाद लाड यांच्या पॅनलने 7 जागा जिंकल्या.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा