नादाला लागला तर त्याला त्याची जागा.. गणेश नाईकांचा थेट इशारा, एकनाथ शिंदेंना..
वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकताच मोठे विधान केले. यासोबतच त्यांनी थेट इशाराही दिला. गणेश नाईक यांनी यादरम्यान कोणाचेही नाव घेतले नाही. पण ते अत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधत असल्याची चर्चा आहे.

शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वतंत्र गटस्थापन करण्याची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मंजूरी देखील दिली. या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. यात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला काही मंत्रिपदे येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या 6 खासदारांपैकी दोघांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. काही आमदारही शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे कळतंय.
यादरम्यानच वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेविरोधात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून 30 वर्ष न झालेल्या पडझडीला न आलेल्या अतिधोकादायक न झालेल्या इमारतींमध्ये क्लस्टर डेव्हलोपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
युडीसीपीआर कुठल्या शहाण्याने आणला असा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणाऱ्या गणेश नाईकांनी नवी मुंबईच्या सर्व इमारतींचा एफएसआय नव्या युडीसीपीआर नुसार वाढला तर नवी मुंबईत जगण्यासारखं काही राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली. यासोबतच त्यांनी थेट मोठा इशाराही यादरम्यान दिला.
गणेश नाईक यांनी पुढे बोलताना म्हटले की, गणेश नाईकच्या नादासा लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देार नाही. गणेश नाईक यांनी हा इशारा दुसरा तिसरा कोणालाही नाही तर अत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांनाच दिला आहे. आता यावर एकनाथ शिंदे नक्की काय बोलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, वाद वाढताना दिसत आहे. ते यावर पहिल्यांदाच आपली भूमिका जाहीरपणे मांडताना दिसले. यासोबतच त्यांनी नाव न घेता इशारा दिला. मात्र, त्यांचा सरळ सरळ निशाणा एकनाथ शिंदेंवरच असल्याची चर्चा आहे.