AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Dipke : संजय शिरसाट, बच्चू कडूंना अभिजीत दिपकेंची भेट महागात, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, मोठी खळबळ

काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती, तर त्यानंतर बच्चू कडू यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली, या भेटीवरून आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

Abhijit Dipke : संजय शिरसाट, बच्चू कडूंना अभिजीत दिपकेंची भेट महागात, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, मोठी खळबळ
शिरसाट, बच्चू कडूंवर शिंदे नाराज Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 01, 2026 | 5:18 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांनी 20 जुलै रोजी संसद भवनावर मोर्चा देखील काढला, अखेर त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. दरम्यान त्यानंतर जेव्हा अभिजीत दिपके हे त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन दिपके यांची भेट घेतली. मात्र या भेटीवरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झाले आहेत.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी परस्पर का गेलात? अशी विचारणा आता एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे. महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजीत दिपके यांची भेट का घेतली असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना झापल्याची माहिती समोर येत आहे.  महायुतीची भूमिका ठरलेली नसताना अशाप्रकारे न विचारता अभिजीत दिपके यांची भेट घ्यायला नको होती असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरेकर यांची प्रतिक्रिया 

दरम्यान बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांच्या या भेटीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. दरेकर यांच्या प्रतिक्रियेवरून या भेटीमुळे भाजप देखील नाराज असल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये वितृष्ट निर्माण होईल असं वागू नका  अशी प्रतिक्रिया या भेटीवर दरेकर यांनी दिली आहे, या भेटीमुळे आता महायुतीत वातावरण तापण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांची कानउघडणी करण्यात आली आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था