माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी, एकाला मुंबईतून अटक

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात एका कथित दिग्दर्शकाला नांदेड पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी, एकाला मुंबईतून अटक
ASHOK CHAVAN
| Updated on: Nov 18, 2026 | 9:06 PM

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना मारण्याची धमकी देतानाच एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात रवी उर्फ रवींद्र गौतम रोकडे ( वय ३९ ) याला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून अटक केली आहे.

आरोपी रवी रोकडे यांनी नांदेडमधील एक व्यावसायिक महेश कृष्णाजी तुतारे यांच्याकडे १४ नोव्हेंबर रोजी फोनवरुन एक लाखाची खंडणी मागितली होती. जेव्हा व्यापाऱ्याने नकार देताच या महेश तुतारे याने धमकीत देत तीन वर्षांपूर्वी आपण कोरेगाव येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि चार आमदारांना एकाच दिवशी उडवण्याची योजना आखली होती. माझ्या पाठीशी मोठ्या लोकांचा हात असल्याचा दावा आरोपी रवी रोकडे याने केली होती.

Loading...

या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप बाहेर आली असून त्यात फियार्दी महेश तुतारे यांच्या तक्रारीवरुन नांदेडच्या वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी रवी रोकडे याला मुंबईतून शिताफीने जेरबंद केले असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक चौकशी करत आहेत.

चव्हाण यांची काय प्रतिक्रीया ?

अशा प्रकारची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झालेली आहे. त्यात माझा आणि नांदेडच्या चार आमदारांना मारण्याचा कट आखल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक झालेली आहे. यासंदर्भात पोलिसांची चौकशी सुरु असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रतिक्रीया देताना म्हटले आहे.

काय आहेत या ऑडिओ क्लिपचे संवाद वाचा…

  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि तुमच्या नांदेड मधील चार आमदार एकाच दिवशीच उडवायचा कारेगावमध्ये मी प्लॅन केला होता.
  • मी सध्या प्रॉब्लेममध्ये आलो आहे, नाहीतर मला तुमचे एक लाख रुपये काही महत्त्वाचे नाहीत,
  • माझ्या पाठीमागे हात भरपूर मोठे आहेत
  • पण मी एकाही जणाला कॉन्टॅक्ट करत नाही, कारण माझा जुना नंबर बंद पडलाय
  • ते नंबर काढायला मला फेसबुकला रिटर्न जावं लागते
  • मागच्या सहा महिन्यात मी तुम्हाला एकदाही आरे कारे शब्द केला नाहीये
  • महेशभाऊ म्हणूनच मी तुम्हाला बोलतोय
  • खैरे काकाला सुद्धा मी महेश या नावाने तुमचा उल्लेख केलाय
  • खैरे काका सोडून द्या, तुम्ही सुशांत भाऊला विचारा, मी एक ही रॉंग मेसेज केलेला नाही
  • तुम्ही जे म्हणले ते भावाचं,भावाच म्हणल्यावर मी एवढा दम ठेवतो,तुमचा अख्खा नांदेड जिल्हा जरी माझ्या वाकड्यामध्ये घुसला ना तरीपण माझं काहीच बिघडू शकत नाही
  • एवढं तुम्हाला मी गॅरंटीन सांगतो बघा, एवढा वाकडा आहे मी
  • राहिला प्रश्न फक्त एक लाखाचा, ते एक लाख जर तुम्हाला नसेल द्यायचे तर मला काही अडचण नाही
  • पण लाईफमध्ये तुम्ही लक्षात ठेवा की रवी रोकडे नावाचा कोणतरी एक माणूस होता
  • माझा नांदेडशी काही एक संबंध नाहीये, माझी बायको नांदेडची आहे, मी उद्या बायको सोडून देतो,मला काही घेणं देणं नाही
  • प्रश्न भावाचा आला ना तर मी तुम्हाला सांगतो ना महेश भाऊ, मला ताकत लावायची गरज नाहीए

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us