
Mumbai Jogeshwari Rape Case: विद्येचं माहेरघर पुण्यानंतर मुंबईत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 12 वर्षीय मुलीवर पाच जणांनी बलात्कार केलाय. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी रोजी घरातून गायब झालेली मुलगी 27 फेब्रुवारी रोजी पालिसांना भेटली. पण तोपर्यंत फार उशिर झाला होता. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मुलीवर अत्याचार करण्यात आले. दादर रेल्वे स्थानक परिसरात आढलेल्या मुलीने पोलिसांना 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यानचा घटनाक्रम सांगितला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुंबईतील जोगेश्वरी येथे तिच्या नातेवाईकांसोबत राहत होती. 24 फेब्रुवारी रोजी मुलगी घरातून गायब झाली. पीडित मुलीच्या काकांनी 26 फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र मुलगी सापडली नाही.
याच दरम्यान, मुलगी 27 फेब्रुवारी रोजी दादर रेल्वे स्थानकात एकटीच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांना संशाय आला आणि त्यांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा त्या 12 वर्षांच्या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दादर पोलिसांनी मुलीला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, एका एसी मॅकेनिकने मुलीचं अपहण केलं. मुलीला एकटी पाहून आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागात असलेल्या त्याच्या घरी नेले. जिथे 26 फेब्रुवारीच्या रात्री तीन तरुणांनी तिच्यावर आळीपाळी बलात्कार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी मुलीने तिघांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.
जोगेश्वरी येथून स्वतःची सुटका केल्यानंतर पीडित मुलगी घाटकोपरपर्यंत पोहोचली. त्यानंतर अन्य दोन पुरुषांनी तिली मदद करतो असं सांगत मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर दादर येथे घेऊन गेले. दोघांनी देखील मुलीवर अत्याचार केले. 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मुलीसोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पाचही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात भांडण झाल्यामुळे मुलगी घर सोडून गेली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 12 वर्षीय मुलीवर झालेल्या घटनेनंतर महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.