AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rape Case: ‘काय करायचं ते कर पण मला…’, स्वारगेट बलात्कार प्रकरण, धक्कादायक माहिती समोर

Pune rape case: स्वारगेट बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, जीवाच्या भीतीला तरुणी घाबरली..., नराधम दत्ता गाडेने दुसऱ्यांदा शरीराचे लचके तोडले..., स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब देखील समोर आला आहे.

Pune Rape Case: 'काय करायचं ते कर पण मला...', स्वारगेट बलात्कार प्रकरण, धक्कादायक माहिती समोर
| Updated on: Mar 03, 2025 | 8:39 AM
Share

Pune rape case: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. बस स्टँडवर एका तरुणीचा बलात्कार झाल्यानंतर पोलीस याप्रकरणी अधिक चैकशी करत असून, बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे याने पीडितेचा गळा दाबला. त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली. आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करु लागली. याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले.

पीडित तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडिता घाबरली आहे, ती फार प्रतिकार करत नाही, ही गोष्ट दत्तात्रय गाडे याच्या लक्षात आली. तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली. त्यामुळे दत्तात्रय गाडे याचे काम सोपे झाले.

पीडित तरुणीचा पोलिसांनी नोंदवला जबाब…

बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने आरोपी दत्ता गाडेला विनंती केली. मला जीवे मारू नको अशी विनंती पीडित तरुणीने आरोपीला केली. दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिल्यामुळे तरुणीने स्वतःच्या जीवासाठी आरोपीकडे विनंती केली. तरुणीचं गावी जायचं तिकीट ही पोलिसांकडे पुरावा जमा करण्यात आला आहे.

आरोपी गाडेच्या मोबाइलची तांत्रिक तपासणी

स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून, पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आलं आहे.

स्वारगेट एसटी स्थानकात परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीकडे आरोपी दत्तात्रय गाडेने प्रवासी तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली. त्यानंतर आवारात थांबलेल्या एका बसमध्ये तिच्यावर गाडेनं बलात्कार केला होता. पसार झालेल्या गाडेला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून ताब्यात घेतलं.

गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस चौकीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गाडेसह शिवशाही बसचा चालक, वाहक यांचे जबाब नोंदविले आहे. गाडेची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

गाडे वापरत असलेला मोबाइल संच पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपासणीत गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे उघडकीस आलं आहे. गाडेने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तरुणीने त्याच्याकडे गयावया केली. त्यानंतर गाडेने तिला धमकावून बसमध्ये दोनदा बलात्कार केला होता. पोलिसांनी शिवशाही बस न्यायवैद्याक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठविली असून, गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.