शरद पवार यांच्या भेटीला गौतम अदानी, ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन विचारपूस..

शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार यांच्या भेटीला अनेकदण पोहोचत आहेत. नुकताच शरद पवार यांच्या भेटीला अदानी पोहोचले.

शरद पवार यांच्या भेटीला गौतम अदानी, ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन विचारपूस..
Sharad Pawar
| Updated on: Nov 06, 2026 | 10:42 AM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज दिल्यानंतर काही तासातच त्यांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. शरद पवार यांची तब्येत खराब झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना फोन करत त्यांची विचारपूस केली होती. राज्यातील अनेक बडे नेते हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. रात्रीच प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट रुग्णालयात घेतली. काही वेळ त्यांच्यात आणि शरद पवार यांच्यात संवाद देखील झाला.

शरद पवार यांची प्रकृती सध्या नॉर्मल असल्याचे सांगितले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्यासोबत रुग्णालयात आहेत. शरद पवार यांची रुग्णालयातील काही फोटोही पुढे आली आहेत. काही टेस्ट शरद पवार यांच्या केल्या जाणार आहेत. त्यातच आता शरद पवार यांच्या भेटीला उद्योजक गौतम अदानी पोहोचले आहेत. गौतम अदानी हे शरद पवार यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

गौतम अदानी सकाळीच शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. राज्यातील जवळपास नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहचत आहेत. रात्री प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण झाले. आज सकाळी मंत्री छगन भुजबळ देखील शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.  पार्थ पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये खटके उडत आहेत.

त्यातच शरद पवार यांच्या भेटीला प्रफुल पटेल पोहोचले. ज्याने विविध चर्चांना उधाण आले. प्रफुल पटेल यांच्याकडून दबाव टाकण्यासाठीच शरद पवार यांची भेट घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या एनसीपीमध्ये काही निर्णय पक्षातील वरिष्ठ नेत्यांना न कळवताच पार्थ पवार घेत असल्याचा आरोप केला जात आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us