Gautami Patil: माझ्यासोबत बरंच काही घडलंय, ते सर्व..; नवरा कसा हवा? गौतमी पाटील स्पष्टच बोलली..
Gautami Patil Husband: गौतमी पाटीलने नुकतेच पुण्यात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, यावेळी तिने तिच्या नवऱ्याबद्दल मोठं विधान केले आहे.

सध्या सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रसिद्ध बाप्पांच्या दर्शनाला जात आहेत. प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलनेही आता बाप्पांचे दर्शन घेतले आहे. नुकतेच तिने पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले आहे. तिथे तिने बाप्पाला लग्नाविषयी काय म्हणाली ते पाहा..
मीडियाशी बोलताना गौतमी म्हणाली, "मी पुण्यात आठवीत असताना आले होते. मी तेव्हा माझ्या आईसोबत आले होते. आता याला बरीच वर्षे झाली, ही माझी दुसरी किंवा तिसरीच वेळ असेल की जेव्हा मी इथे येऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. मला खूप छान आणि प्रसन्न वाटले.
बाप्पाकडे काय मागितलं असे विचारले असता गौतमी म्हणाली, बाप्पाकडे एकच मागणी केली आहे की, बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम असूदे, आपली सगळ्यांची संकट दूर होऊदे. यानंतर तिला लग्नाबाबत विचारण्यात आले.
तेव्हा ती आधी हसली, मग लाजली आणी म्हणाली की, अजून डोक्यात नाही. पण जेव्हा मी लग्नाचा विचार करेन तेव्हा मी कधी लग्न करतेय हे सगळ्यात आधी प्रेक्षकांना सांगेन. आणि मला चांगला कुणी भेटला तर नक्कीच उरकेन."
याआधीही काही मुलाखतीत गौतमीला तिच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं आहे. तेव्हा तिने सांगितलं, "इन्स्टाग्रामवर मला खूप मेसेज असतात. आय लव्ह यू गौतमी, आय लाइक यू, हे प्रेक्षकांचे प्रेम आहे. तर कार्यक्रम सुरू असतानाच मला अनेकदा मागणीही आल्यात. पण मला इतक्या लवकर लग्न करायचे नाहीये. कारण आताशी माझ्या करिअरची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सध्यातरी मला यात पडायचे नाही.
"मला पार्टनर हवा जो सगळं समजून घेईल, बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत, तर त्याने स्वीकारणारी असावी." असं गौतमी पाटील म्हणाली.