AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : लक्ष्मीपूजनापूर्वी वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय कराच, घरात येईल सुख, समृद्धी

हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो. दिवाळीला दरवर्षी लक्ष्मीपूजन देखील केलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये लक्ष्मीपूजनापूर्वी करायचे काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आपल्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो, आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : लक्ष्मीपूजनापूर्वी वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय कराच, घरात येईल सुख, समृद्धी
LAXMI POOJANImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 3:16 PM
Share

दिवाळी हा हिंदू धर्मामधील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला दरवर्षी लक्ष्मीपूजन केलं जातं. यंदा लक्ष्मीपूजन रविवारी आठ नोव्हेंबर रोजी आहे. घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहावा, घरात लक्ष्मी मातेच्या कृपेनं सुख, समृद्धी आणि शांती यावी यासाठी दर वर्षी मोठ्या भक्तीभावाने लक्ष्मी पूजन केलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये लक्ष्मीपूजनापूर्वी करण्याचे काही सोपे -सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. यामुळे तुमच्या घराला बरकत प्राप्त होते. एवढंच नाही तर घरात लक्ष्मी मातेच्या कृपेनं सुख समृद्धी येते. आज आपण अशा काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हे सर्व उपाय तुमच्या घराच्या उंबऱ्याशी संबंधित आहेत. उंबरा हा केवळ तुमच्या घराची बॉर्डर नाहीये, तर त्यामुळे तुमच्या घराची संपूर्ण चौकट पूर्ण होते, त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये उंबरा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे.

लक्ष्मी पूजनापूर्वी करण्याचे उपाय – उंबरा हा कोणत्याही घराचा मुख्य भाग असतो, कारण इथून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते, जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, तेव्हा तुम्हाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो, या उलट जेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात येते, तेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेसोबतच सुख समृद्धी देखील येते. त्यामुळे बाहेरून घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये, यासाठी तुम्ही लक्ष्मी पूजनाआधी तुमच्या उंबऱ्याच्या बरोबर मध्य भागी एखादी चांदीची वस्तू पुरून ठेवू शकतात, त्यामुळे सर्व प्रकारची वाईट शक्ती बाहेरच नष्ट होईल, तुमच्या घरात केवळ सकारात्मक ऊर्जा येईल, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

उंबऱ्याचं पूजन – तसेच तुम्ही उंबऱ्याचं पूजन देखील करू शकता, दररोज उंबऱ्याचं पूजन करणं हे वास्तुशास्त्रामध्ये शुभ माण्यात आलं आहे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा पुसून घ्यावा. त्या पाण्यामध्ये थोडं सैंधव मीठ टाकावं. मिठाच्या पाण्याने उंबरा पुसल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, अशी मान्यता आहे. यामुळे सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून आपल्या घराचं संरक्षण होतं, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

तसेच घराच्या मुख्य उंबऱ्याजवळ कधीही चप्पल स्टँन्ड ठेवू नये, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तुमच्या चपला या कधीही मुख्य दरवाजाच्या समोर ठेवू नयेत, यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण