Satej Patil: गोकुळमधील पराभवानंतर सतेज पाटील पहिल्यांदाच बोलले; पत्रकार परिषदेत महायुतीला सुनावलं, म्हणाले- कोरमचा विषय नव्हता त्यांना फक्त…

Satej Patil Press Conference News: गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुती सरस ठरली आहे. यानंतर सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली आहे.

Satej Patil: गोकुळमधील पराभवानंतर सतेज पाटील पहिल्यांदाच बोलले; पत्रकार परिषदेत महायुतीला सुनावलं, म्हणाले- कोरमचा विषय नव्हता त्यांना फक्त...
Satej Patil Press Conference Slams Mahayuti
| Updated on: Nov 10, 2026 | 5:38 PM

गोकुळच्या निवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. या निवडणुकीत सतेज पाटलांना मोठा धक्का मिळाला आहे. महायुतीचे राजेश पाटील यांनी शशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे. सतेज पाटील यांच्या हातून सत्ता निसटली आहे. यानंतर आता सतेज पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्रातील सामान्य माणूस आंदोलनात आला आहे. फक्त गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी 4 जणांची नेमणूक झाली आहे. चंद्रकांत पाटलांनी डी.वाय. पाटलांचा अपमान केला आहे. कोरमचा विषय नव्हता. त्यांना फक्त सत्ता मिळवायची होती. कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्‍यांवर दबाव आणला आहे.

Loading...

ते म्हणाले की, चंद्रकांत पाटलांची वैचारिक पातळी कमी होत चालली आहे. तुम्ही सरकारी यंत्रणेतून मला धमकी देऊ नका. लढायचं असेल तर 2029 मध्ये समोरासमोर लढा.  मुश्रीफांचं राजेश पाटलांवर अचानक प्रेम आलं आहे. दौलत कारखाना देताना त्यांनी राजेश पाटील आठवले नाहीत.  आज कुणाचा उन्माद दिसला आहे. गोकुळमध्ये काही चुकीचं झाल्यास आमचे संचालक विरोध करतील.  माझ्यावर एकेरी भाषा वापरून मला महाराष्ट्रभर पोहचवलं आहे.  महायुतीने जनतेचा कौल घालवण्याचं पाप केलं आहे. केवळ ३ महिन्यांसाठी ह्या संचालकांची नेमणूक असल्याची माहिती मिळाली आहे, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us