सतेज पाटलांना मोठा धक्का? कोर्टाच्या आदेशाने गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, सरकारचे 4 सदस्य मतदान करणार पण…

कायद्याप्रमाणे त्यांना अधिकार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या चारही सदस्यांचे मतदान ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजेच अध्यक्षांची निवड 29 सदस्य मिळून करतील. त्यामुळे या चार सरकारनियुक्त सदस्यांनी महायुतीच्या बाजूने मतदान केले तर हा सतेज पाटलांना मोठा धक्का बसू शकतो.

सतेज पाटलांना मोठा धक्का? कोर्टाच्या आदेशाने गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, सरकारचे 4 सदस्य मतदान करणार पण...
gokul dudh sangh president election
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 6:54 PM

Gokul President Election : पूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संस्थेच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. हा निकाल म्हणजे एका प्रकारे सतेज पटील यांना धक्काच असल्याचे बोलेल जात आहे. आपल्या आदेशात अध्यक्षपदाची निवडणूक रोखण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेले नाही. सोबतच सरकारने नियुक्त केलेल्या चार संचालकांचे मतही ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या हातातून गोकूळ जाण्याची शक्यता निर्माण झालीय. आता उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

29 सदस्य मतदान करतील

आता 10 नोव्हेंबर रोजी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. तसेच शासनाने नेमलेल्या चार सदस्यांबाबतचा अध्यादेश चूक आहे की बरोबर हे अंतिम निकालात ठरेल. विशेष म्हणजे निवडून आलेले 25 सदस्य आणि सरकारने नेमलेले चार सदस्य देखील म्हणजेच 29 सदस्य मतदान करतील. पण यावेळी शासनाने नेमलेले चार संचालकांची मतं वेगळी ठेवली जाणार आहेत. तसेच त्यांचे बॅलेट पेपर जपून ठेवले जाणार आहेत.

Loading...

सरकार नियुक्त सदस्यांचे मत ग्राह्य धरले जाणार

विशेष म्हणजे या निवडणुकीत 25 सदस्यांना निवडणुकीबाबत यापूर्वीच निवडणुकीत मतदान करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. इतर चार सदस्यांना नोटीस देण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी घेतील. कायद्याप्रमाणे त्यांना अधिकार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या चारही सदस्यांचे मतदान ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजेच अध्यक्षांची निवड 29 सदस्य मिळून करतील. त्यामुळे या चार सरकारनियुक्त सदस्यांनी महायुतीच्या बाजूने मतदान केले तर हा सतेज पाटलांना मोठा धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे हे चार सरकारनियुक्त सदस्य महायुतीच्याच बाजूने मतदान करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उद्या ते 4 सदस्य मतदान करणार का? पाहावे लागणार आहे.

दरम्यान, आमची कोर्टातील तसेच रस्त्यावरची लढाई सुरूच राहील, असे सतेज पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनी कोल्हापुरात संघर्ष मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us