चालत्या एसटीचा एक टायर निघून शेतात गेला, चालक कंडक्टर प्रवासी भांबावले, शेवटी…

चालत्या एसटी गाडीचा टायर निघाला, जोराचा आवाज झाला. आतमध्ये असलेल्या प्रवाशांना घाम फुटला अशी परिस्थिती गोंदियामध्ये पाहायला मिळाली आहे. भंगार गाड्या चालवणे कधी बंद करणार असा संतप्त सवाल प्रवासी करीत आहेत.

चालत्या एसटीचा एक टायर निघून शेतात गेला, चालक कंडक्टर प्रवासी भांबावले, शेवटी...
sangli crime news
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 28, 2023 | 12:10 PM

गोंदिया : सांगली (sangli) आणि बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात काल एसटी दोन घटना घडल्या. आज पुन्हा गोंदिया जिल्ह्यात तोचं गोंधळ पाहायला मिळाला आहे. गोंदिया आगाराची बस क्रमांक एम एच 40 एन 8603 या गाडीचा एक टायर अचानक निघाला. त्यावेळी गाडीत जवळपास पंधरा ते सोळा प्रवासी होते अशी माहिती मिळाली आहे. निघालेला टायर थेट शेतात गेला, गाडी तीन चाकावर काहीवेळ चालली. त्यानंतर चालकाने गाडी (st bus news) शिस्तीत एका बाजूला घेतली. त्यामुळे आतमध्ये असलेल्या प्रवाशांचा जीव वाचला. त्यावेळी आतमध्ये असलेले प्रवासी प्रचंड संतप्त झाले होते.

गोंदिया आगाराची बस क्रमांक एम एच 40 एन 8603 ही बस तुमसर वरून गोंदियाकडे येत असताना गंगझरी आणि डोंगरगावच्या मधोमधं बसचा समोरील टायर अचानकपणे निघून बाजूच्या शेतात गेला. त्यामुळे बस तीन चाकांवर काही अंतरापर्यंत चालली, मात्र ड्रायव्हरच्या चलाख पणामुळे बस एका बाजूला थांबली. मोठा अपघात टळला असल्याचं प्रवासी सांगत आहेत. आतमध्ये असलेले सगळे प्रवासी घाबरले आहेत. त्याचबरोबर किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगत आहेत. आतातरी एसटी महामंडळ भंगार बस रस्त्यावर चालवणे बंद करणार का ? असा सवाल नागरिक करीत आहेत.

सांगली जिल्ह्यातील एक एसटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चालकाच्या हाती स्टेरिंग आहे, तर महिल कंडक्टरच्या हाती अॅक्सेलेटरची दोरी आहे. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सुध्दा काल क्लजप्लेट गेलेली गाडी ५० किलोमीटरपर्यंत चालवली असल्याचं प्रवासी सांगत आहेत. दोन दिवसातला हा तिसरा प्रकार असल्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.