कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 27 जनावरांची सुटका, 10 लाख, 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक

याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. तसेच अवैध जनावर वाहतूक प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींवर गुव्हा दाखल केला असून नवेगावाबांध येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 27 जनावरांची सुटका, 10 लाख, 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक
नवेगावबांध पोलिसांकडून अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 2:50 PM

गोंदियाः जिल्ह्यातील नवेगाव पोलिसांनी एका कारवाईत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या तब्बल 27 जनावारांची सुटका केली आहे. या घटनेत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सदर आरोपींकडून पोलिसांनी 10 लाख 70 हजार रूपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.

कत्तलीसाठी नेली जात होती जनावरे

या कारवाईत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवेगाव पोलिसांना गुप्त बातमी मिळाली होती. चिचगडकडून नवेहाव बांघ, सानगडी मार्गे दहा चाकी ट्रकमध्ये अवैधरित्या कत्तलीसाठी गायी नेल्या जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यांनी येथील टी पॉइंट चौकात नाकाबंदी केली. दहा चाकी ट्रकची तपासणी केली असता दोरीने करकचून बांधलेली ही जनावरे आढळून आली. तसेच जनावरांनी ओरडू नये म्हणून त्यांचे दोरीने तोंड बांधले होते. एकाच गाडीत जनावरांना अतिशय निर्दयीपणे कोंबण्यात आले होते. काही जनावरे अर्धमेल्या अवस्थेतही असल्याचे आढळून आले. या सर्व 27 जनावरांची सुटका करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

चौघांना अटक, 10 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी नवेगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यात प्रजेश पायकास मसीहा, प्रियेसदास प्रविणदास दास, सुपेंद्र आरविन मसीहा, मोंटू सिंग अशा चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. तसेच अवैध जनावर वाहतूक प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींवर गुव्हा दाखल केला असून नवेगावाबांध येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.

इतर बातम्या-

कोरोनाचा पॅरोल पथ्यावर? राज्यातल्या 20 हजार कैद्यांची कायमची सुटका? काय आहे, सर्वोच्च न्यायालयातला खटला?

आधी आमचं लग्न लावून द्या..प्रियकर-प्रेयसीचं शोले स्टाइल आंदोलन, बीडमध्ये 10 तास फुल्ल ड्रामा!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.