व्यवसाय दूध विक्रीचा, वय वर्षे ८१, मुन्नालाल यांनी धावण्याच्या स्पर्धेत मिळवले तीन गोल्ड मेडल

| Updated on: Jul 17, 2023 | 4:17 PM

कामाला वयाचे बंधन नाही. हे मुन्नालाल यादव यांनी दाखवून दिले. त्यांचे वय आहे ८१ वर्षे. उत्तराखंडमधील डेहराडून येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी तीन गोल्ड मेडल मिळवले.

व्यवसाय दूध विक्रीचा, वय वर्षे ८१, मुन्नालाल यांनी धावण्याच्या स्पर्धेत मिळवले तीन गोल्ड मेडल
Follow us on

गोंदिया : मुन्नालाल यादव यांनी डेहराडून येथे ज्येष्ठ नागरीक ऍथलेटिक स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय खुल्या वर्गात, स्वर्गीय महाराणी महिंद्र कुमारी माजी खासदार स्मृती ॲथलेटिक स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर आणि 5 किलोमीटर या स्पर्धेत भाग घेतला. त्यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत त्यांना तीन सुवर्णपदके मिळाली. दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात दुबई येथे होणार आहे.

दुबईतील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार

मुन्नालाल यादव हे गोंदिया शहरात राहणारे असाधारण व्यक्तिमत्व. आज त्यांचे वय 81 वर्ष आहे. तरी तरुणाईला लाजवेल अशी गोष्ट त्यांनी या वयात सुद्धा साध्य करून दाखवली. दुबई येथे होणाऱ्या ज्येष्ठ नागरीक अॅथलेटिक स्पर्धेमध्ये भारताच्या वतीने ते जाणार आहेत.

तरुणाईसाठी प्रेरणास्थान

कामाला वयाचे बंधन नाही. हे मुन्नालाल यादव यांनी दाखवून दिले. त्यांचे वय आहे ८१ वर्षे. उत्तराखंडमधील डेहराडून येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी तीन गोल्ड मेडल मिळवले. ज्येष्ठ नागरिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्यांनी गोंदियाचे नाव गाजवले. जिद्द असेल तर काहीही करू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यश मिळवण्यासाठी वयाचे बंधन नसते. ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईला त्यांनी प्रेरणा दिली.

मेडलने भूक भागवता येत नाही

मुन्नालाल यादव हे सामान्य कुटुंबातील आहेत. घरी पती-पत्नी हे दोघेच राहतात. आजपर्यंत त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. परंतु मेडल मिळून पोटाची भूक भागविता येणार नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विजेत्यांना जाण्याऐण्याचा खर्च भागेल एवढी रक्कम द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मुन्नालाल सध्या दूध विक्रीतून घर चालवतात. पण, शासनाने ज्येष्ठ धावपटूंना मानधन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.