मोठी बातमी! दुष्काळात शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आग्रीम मदत म्हणून 5 हजार रुपये देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यसह देशात यंदा भीषण दुष्काळ आहे. पावसावर ऐल निनोच संकट निर्माण झाल्याने यावर्षी मान्सूनच्या पावसामध्ये मोठा खंड पडला, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर पाऊस झाला नाही. पाऊसाभावी यंदा खरीप पीकं हाताची गेली, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अन्न धान्याची तर टंचाई आहेच, परंतु आता जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या सर्व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आग्रीम मदत म्हणून 5 हजार रुपये देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रब्बी हंगामसाठी सरकारकडून एकूण 62 हजार 370 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. खत अनुदानासाठी केंद्र सरकारकडून 62 हजार 370 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. डीएपीची एक गोणी आता 1 हजार तीनसे पन्नास रुपयांनाच मिळणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अनुदानाच्या बजेटमध्ये 24 हजार 418 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरण्याची शक्यता आहे.
राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे. पाऊसच न पडल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदा ऐल निनोचं मोठं संकट मान्सूनवर निर्माण झालं आहे. सुरुवातीला जूनचे शेवटचे दोन आठवडे आणि संपूर्ण जुलै महिना चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाला ब्रेक लागल्याचं पहायला मिळालं. जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच पेरण्या करून ठेवल्या होत्या. परंतु त्यानंतर पाऊसच न झाल्याने उभं पीक वाळून गेलं. खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला. आता शेतकऱ्यांचे डोळे हे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. राज्य सरकारकडून आग्रीम मदत म्हणून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामसाठी सरकारकडून एकूण 62 हजार 370 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.